रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1413 चाचण्यात 144 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 8 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 1413 चाचण्या झाल्या त्यात 144 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 27 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे
22 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 113 चाचण्या झाल्या त्यात सात
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे
63 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 878 चाचण्या झाल्या
त्यात 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 25 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 92
चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर
हेडगेवार लॅब येथे 86 चाचण्या झाल्या त्यात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोला
येथे 50, बार्शीटाकळी येथे 11, पातूर येथे 30, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1413 जणांच्या
चाचण्या होऊन त्यात 144 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1
लक्ष 21 हजार 856 चाचण्या झाल्या पैकी 10454 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा