वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरची पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनी केली पाहणी
अकोला, दि.13 (जिमाका)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
कोविड केअर सेंटरला भेट देवून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधाची पाहणी
केली. दरम्यान रुग्णाना चांगल्या दर्जाचे जेवण व रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला
व बालविकास, इतर
मागासवर्ग, सामाजिक
व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, वैद्यकीय महाविद्यालयाचे
उपधिष्ठाता डॉ.घोरपडे, डॉ. अष्ट्रपुत्रे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदि उपस्थित होते. पाहणीदरम्यान रुग्णालयातील
वार्डाची पाहणी करुन उपचार घेत असलेल्या
रुग्णांशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनाच्या समस्या
तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा