महिला व बालविकास मंत्री ना.ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

अकोला, दि. 2  (जिमाका)- राज्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा सोमवार दि.3 मे रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. 

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि.3  मे रोजी सकाळी 10 वा 30 मि. नी अमरावती येथून शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण व सकाळी 11 वा.10 मि.नी. आगमन व कोवीड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12 वा. महिला व बालविकास विभागाचा आढावा, दुपारी 12 वा. 45 मि.नी अकोला विश्रामगृहकडे प्रयाण व दुपारी 12 वा.55 मि.नी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथून केशव नगर जवळ ऑटो स्टॅाप, कौलखेडकडे प्रयाण व दुपारी सव्वा दोन वाजता गुरुवर्य श्री. रंगरावजी टापरे, कौलखेड येथे आगमन व सदिच्छा भेट, दुपारी 2 वा.45 मि.नी गोट फॉर्म सांगवी मोहाडी, अकोट रोड, अकोलाकडे प्रयाण व दुपारी तीन वाजता आगमन व श्री. नरेश देशमुख, संचालक गोट बँक यांच्याशी चर्चा. दुपारी साडेतीन वाजता दर्यापूर मार्ग अमरावतीकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन