इच्छुक दाम्पत्यांनी बालकांच्या संगोपनासाठी दत्तक प्रक्रियेत सहभागी व्हावे दत्तक प्रक्रियेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आवाहन; मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा
इच्छुक दाम्पत्यांनी बालकांच्या संगोपनासाठी दत्तक प्रक्रियेत सहभागी व्हावे दत्तक प्रक्रियेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आवाहन; मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा अकोला दि. 16: अनाथ, निराधार आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना प्रेमळ कौटुंबिक वातावरण, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी दत्तक विधान प्रक्रिया राबविण्यात येते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि दत्तक नियमावली २०२२ नुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते. इच्छुक पात्र दाम्पत्यांनी दत्तक प्रक्रियेत सहभागी होऊन बालकांना कुटुंबाचा आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अकोला यांनी केले आहे. दत्तक घेण्यासाठी पात्रता व वयोमर्यादा : दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता-पित्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक क्षमता सक्षम असणे आवश्यक आहे. दत्तक प्रक्रियेसाठी पती-पत्नी दोघांची संमती आवश्यक असून, एकल महिला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते, तर एकल पुरुष केवळ मुलगा दत्तक घेऊ शकतो. बालकाच्या वयानुसार दत्तक घेणाऱ्या भावी माता-पित्यांच्या कमाल...