रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1360 चाचण्यात 193 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 12 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 1360 चाचण्या झाल्या त्यात 193
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला येथे 135 चाचण्या
झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 100 चाचण्या
झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 27 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी
येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, पातूर येथे 29 चाचण्या
झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेल्हारा येथे 90 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
मुर्तिजापूर येथे 136 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला
महानगरपालिका येथे 616 चाचण्या झाल्या त्यात 52 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 97 चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 83 चाचण्या झाल्या त्यात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. अकोला आयएमए येथे 16, जिल्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 17 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1360 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 193 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 27 हजार 180
चाचण्या झाल्या पैकी 11267 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा