पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केला श्री. डोंगरे यांचा सत्कार

 



अकोला,दि. 1 (जिमाका)-  माहिती व जनसंपर्क विभागातील श्री. नितीनकुमार डोंगरे हे 30 वर्षाची सलग सेवा करुन शुक्रवार दि. 30 एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते शाल, श्रीफळपुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करुन सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.      

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, गाडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती सहायक सतिश बगमारे, कॅमेरामन चंद्रकांत पाटील, हबीब शेख, लिपीक वर्षा मसने, रोनिओ ऑपरेटर सुनिल टोमे यांनी श्री. डोंगरे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन