रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1848 चाचण्यात 167 पॉझिटीव्ह
अकोला,दि.22 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 1848 चाचण्या झाल्या त्यात 167 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे चार चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अकोट
येथे 65 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 102 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
बार्शी टाकळी येथे 84
चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. पातूर येथे 113 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 243 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 240 चाचण्या झाल्या त्यात 25 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 790
चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, आरोग्य
कर्मचाऱ्यांच्या 30 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 82 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 83 चाचण्या झाल्या त्यात 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
असे 1848 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 167 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात १ लक्ष 42 हजार 449 चाचण्या झाल्या पैकी 12984
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा