पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण,रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

  महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास वर्गीय घटकांसाठी शिक्षण, रोजगार स्वयंरोगारासाठी सहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती करुन देणारा हा लेखः स्‍थापना महाराष्‍ट्र शासनाचा उपक्रम म्‍हणून 23 एप्रिल 1999 रोजी कंपनी अधिनियम 1956 अन्वये महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्‍वये नोंदणी करण्‍यात आली आहे. त्याच प्रमाणे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग   आथिक विकास महामंडळाची स्‍थापना 18 जून 2010 रोजी महाराष्‍ट्र राज्‍य इतर मागासवर्गीय वित्‍त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्‍हणून करण्‍यात आली. उद्दिष्ट राज्‍यातील इतर मागासवर्गियांच्‍या कल्‍याण व विकासासाठी कृषी विकास , पणन , संस्‍करण , कृषी उत्‍पादनांचा पुरवठा आणि साठवण , लघुउद्योग , इमारत बांधणी , परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्‍य व्‍यवसाय (वैद्यकीय , अभियांत्रिकी , वास्‍तुशास्‍त्रीय) व्‍यापार किंवा उद्योग यांची योजना आखणे , त्‍यांना चालना देणे , सहाय्य करणे , सल्‍ला देणे , मदत करणे , वित्‍त पुरवठा करणे. इतर

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत नऊ पॉझिटीव्ह, तर 18 डिस्चार्ज

          अकोला दि. 3 1 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 96 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून दोन असा एकूण नऊ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   तर 18 जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 7 व खाजगी 2 ) 9 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   =एकूण पॉझिटीव्ह 9. आरटीपीसीआर ‘ नऊ ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व चार महिलेचा समावेश असून हे रुग्ण बार्शीटाकळी व   अकोला ग्रामीण येथील प्रत्येकी एक प्रमाणे, मुर्तिजापूर येथील दोन तर उर्वरित तीन रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत . तसेच दोन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सहा पॉझिटीव्ह, तर 26 डिस्चार्ज

                  अकोला दि. 30 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 117 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून दोन असा एकूण सहा जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   तर 26 जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 4 व खाजगी 2 ) 6 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   =एकूण पॉझिटीव्ह 6 . आरटीपीसीआर ‘ सहा ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व तीन महिलेचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत . तसेच दोन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. 26 डिस्चार्ज आज दिवसभरात 26 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला,   अशी माहिती जिल्हा

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह, तर पाच डिस्चार्ज

          अकोला दि.29(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 125 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   तर पाच जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   =एकूण पॉझिटीव्ह 5. आरटीपीसीआर ‘पाच’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व दोन महिलेचा समावेश असून हे रुग्ण तेल्हारा येथील एक व उर्वरित चार जण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. पाच डिस्चार्ज आज दिवसभरात पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.   सक्रिय रुग्ण ‘ 89 ’ जिल्ह्यात ए

निंभा येथील ईवर्ग जमीनीवरील अतिक्रम काढले; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण

अकोला दि .29( जिमाका)-     मुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपपंचायत निंभा येथील ईवर्ग जमिनीवर कास्तकारांनी 70 एकर जमिनी अतिक्रमण केले होते.   अतिक्रमण जमीन हटवून वृक्षरोपण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी, असे निर्देश निंभा ग्रामपंचायत भेट दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. उ पविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व   तहसिलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यावेळी मुर्तिजापूरचे नायब तहसिलदार उमेश बनसोड,सहायक गटविकास अधिकारी चंद्रशेखर वंजारी, विस्तार अधिकारी विजय किर्तने, निंभा ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आदि उपस्थित होते. 00000

नोंदणी व मुद्रांक विभाग; शनिवार व रविवारी सुरु राहिल

अकोला दि.29(जिमाका)- नोंद णी व मुद्रांक विभागामार्फत दंड सवलत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा पहिला टप्पा रविवार दि. 31 जुलै रोजी संपत आहे. या योजनेचा नागरिकांना लाभ मिळावा याकरीता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार दि. 30 व 31 जुलै रोजी सुरु राहिल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग-2चे बी.के. मेश्राम यांनी केले आहे. ०००००

‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव; ‘महावितरण’ची कामगिरी कौतुकास्पद: मान्यवरांचा सूर

इमेज
  अकोला दि.29(जिमाका)-   देशाने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली असून यामध्ये महावितरणाचा मोठा वाटा आहे. वीज ही विकासाची जननी असून जीवनाचा अविभाज्य घटक आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वीज पोहोचवण्याची महावितरणची कामगिरी कौतुकास्पद आहे, असा सूर विविध मान्यवरांनी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव या कार्यक्रमात लावला, व महावितरण च्या कामगिरीचे कौतुक केले.               जिल्हा नियोजन भवन येथे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य,   पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सवाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी   जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, नोडल अधिकारी दिपक जैन आदि उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सात पॉझिटीव्ह,13 डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू

        अकोला दि.28(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 138 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून दोन असा एकूण सात जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   तर 13 जणांला डिस्चार्ज देण्यात आले. तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 5 व खाजगी 2)7+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   =एकूण पॉझिटीव्ह 7 . आरटीपीसीआर ‘सात’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलेचा समावेश असून हे रुग्ण बाळापूर, मुर्तिजापूर, पातूर, अकोला ग्रामीण व अकोला मनपा हद्दीतील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तसेच दोन रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे , अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. 13 डिस्चार्ज

कावड पालखी उत्सवःमंडळ प्रतिनिधींची मंगळवारी (दि.2 ऑगस्ट) बैठक

अकोला दि .28( जिमाका)-       श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी राजराजेश्वर महादेव मंदिरात कावड पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाचे आयोजन, कायदा व सुव्यवस्था, रहदारीचे नियमन यासंदर्भात मंगळवार दि.२ ऑगस्ट रोजी कावड पालखी मंडळ उत्सव प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वा. जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. या बैठकीस मंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे,असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे. ०००००

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

अकोला दि .28( जिमाका)-     दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत डाक विभागाव्दारे इयता सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेव्दारे विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट संग्रहणाचे छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटेली प्रतियोगिता घेतली जाते. या प्रतियोगितेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.             महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलमधील 40 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी फिलाटेल डिपॉझिट ॲकाऊंट काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच फिलाटेली आधारित लेखी परीक्षा दि. 15 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय कार्यालयात घेण्यात येईल. प्रतियोगितेचा निकाल दि. 10 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. क्षेत्रीय स्तरावरील लेखी परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी फिलाटेल प्रोजेक्ट दि. 2

सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट)‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

इमेज
  अकोला दि .२८( जिमाका)- अतिविशेषोपचार ( सुपरस्पेशालिटी) रुग्णालयात उपचार सुविधा देण्यास सोमवार दि.१ ऑगस्ट पासून सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. दरम्यान दि. १ ऑगस्टपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग, किडनी रोग, बर्न व प्लास्टिक सर्जरी, मेंदू विकार हे चार विभाग कार्यान्वित होतील. तसेच सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण कक्षातून संदर्भित केलेल्या रुग्णांवर येथे उपचार होतील,असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला आज सकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिलेत. त्यानुसार उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामुग्री यांचा विचार करता व भविष्यात टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ प्राप्त होईपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मर्यादित सुविधा देण्यास सुरुवात करावी. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्ण संदर्भित करुन त्यांचेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार होतील,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच सुपरस्पेशालिटी रुग्णालय कार्यान्वित करण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार :ऑनलाईन आवेदने मागविली; दि.७ ऑगस्टपर्यंत मुदत

  अकोला दि.२८(जिमाका)- राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले  राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२  साठी हे पुरस्कार  वस्तूनिष्ठ  निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत.  या पुरस्कारासाठी आवेदन करू  इच्छिणाऱ्या  प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक  शिक्षकांनी  https://docs.googIe.com/forms/d/e/1FAlpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4 EYXWyVrLvF7E4f448GWvW90/viewform?pIi=1     या लिंकवर आपली आवेदने दि.२८ जुलै ते ७ ऑगस्ट पर्यंत सादर करावीत, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.सुचिता पाटेकर यांनी कळविले आहे.

‘सखी’ वन स्टॉप सेंटर तर्फे महिलांना मार्गदर्शन

  अकोला दि .28( जिमाका)-    वन स्टॉप सेंटर व मैत्री फेलो नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी(दि.26) गुलजार पुरा , सम्राट अशोक बुद्ध विहार येथे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. वन स्टॉप सेंटरचा उद्देश व कामाविषयी माहिती देवून जनजागृती करण्यात आली. यावेळी वन स्टॉप सेंटर केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे , मैत्री फेलोच्या सुषमा मेश्राम , शितल रामटेके , प्रेमदास गजभिये , प्रिया इंगळे , अक्षय चतरकर , रुपाली वानखडे , रोशन ताले व  परिसरातील महिला उपस्थित होत्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव;‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

इमेज
  अकोला दि .२८( जिमाका)-     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि.२९ रोजी ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वा. असे दोन कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम अकोला येथे सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे होणार असून  दुसरा कार्यक्रम सायंकाळी पाच वा. श्रद्धासागर सभागृह, दर्यापूर रोड, अकोट येथे होणार आहे, या कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे. जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, लोकसभा सदस्य खा. संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, ॲड, किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख या मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.   तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महाव

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत आठ पॉझिटीव्ह, तर सात डिस्चार्ज

        अकोला दि.27(जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 126 अहवाल प्राप्त झाले.   त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांचा   आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला ,   तर सात जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 8 व खाजगी 0) 8 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी   शुन्य   =एकूण पॉझिटीव्ह 8 . आरटीपीसीआर ‘आठ’ आज   दिवसभरात    आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व सहा महिलेचा समावेश असून हे रुग्ण तेल्हारा, बार्शीटाकळी, अकोला ग्रामीण व अकोला मनपा हद्दीतील प्रत्येकी एक, तर अकोट व बाळापूर येथील प्रत्येकी दोन प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सात डिस्चार्ज आज दिवसभरात सात रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद

विशेष लेख : आपला राष्ट्रध्वज तिरंगा

येत्या दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या देशावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमिवर आपल्या राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजाविषयी जाणून घेऊ या. भारताचा राष्ट्र ध्वज हा   भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्र ध्वज आपल्या राष्ट्राबद्यलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा तिरंगा पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी, त्याचे   रक्षण   करण्याकरीता अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. तिन रंगांनी बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांबाबत व त्यावर अंकित अशोक चक्राबाबत संविधान सभेत डॉ. एस. राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले की –‘भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे. आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वतः ला वाहून घेतले पाहिजे,   मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी   असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे अशा वनस्पती जीवना