थेट बांधावर खते मोहीमेस सुरूवात

 



    अकोला,दि.9(जिमाका)- अकोला जिल्हामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके खरेदीसाठी गर्दी होऊ नये. याकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.कांतप्पा खोत यांच्या मार्गदर्शनखाली नियोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने अकोला तालुक्यातील शेतकरी गटाच्या वतीने DAP - 40 गोणी,10:10:26 - 40 गोणी ,  Urea -20 गोणी एकुण 1 लक्ष 7  हजार रूपये रासायनिक खते खरेदी करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी डि.एस.प्रधान , आत्माचे तालुका तंञज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार, पं.स कृषी अधिकारी अनिल राठोड, धनंजय मेहेरे, सुभाष राऊत व गटातील सदस्य उपस्थित होते. ही खते व बियाणे शेतकरी गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ