पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता अर्ज आमंत्रित; 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

इमेज
अकोला , दि.   31 ( जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय, बाभूळगाव(जहाँ) अकोला येथे शैक्षणिक सत्राकरीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून या निवड चाचणी परिक्षेचे आवेदन पत्राकरीता बुधवार   दि. 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर इच्छुक विद्यार्थी व पालकांनी विहीत मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. 000000

‘जिल्हा उद्योग मित्र समिती’च्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

इमेज
            अकोला , दि.30 ( जिमाका)-   जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी   तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजना यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत आज   जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा घेण्यात आला. उद्योजकांना   उद्योग चालविण्यासाठी येणाऱ्या स्थानिक पातळीवरील समस्या संबंधित विभागाने आपापसात समन्वय साधून सोडवाव्या ,   असे निर्देश त्यांनी दिले.              जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम ,   अपर अधिक्षक अभियंता गणेश महाजन ,   एमएसईसीबीचे के.एच. वाकडे , उपकार्यकारी अभियंता सुधीर अंबुलकर, अकोट महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके,   अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू ,   विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.                   आढावा बैठकीत जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विव

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप कथा, कविता, गोष्टी,गाण्यांमधून व्हावेत मराठीचे संस्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे प्रतिपादन

इमेज
अकोला , दि.   ३० ( जिमाका)- शालेय जीवनात मराठी शिक्षणाचा अंतर्भाव असतो. मात्र विद्यार्थ्यांना कथा, कविता, गोष्टी, गाणी, गप्पा या माध्यमातून मराठी भाषेचे संस्कार व्हावेत, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपानिमित्त आज येथील कोठारी कॉन्व्हेंट स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संस्थेचे पदाधिकारी नारायण भाला, अनिल राठी, मराठी भाषा समिती सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, समन्वयक किशोर बळी आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीमती अंजली कडलासकर या होत्या. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत; महत्त्वाच्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. गीत गायन, अभिवाचन, अभिनय, नाट्यछटा, सादरीकरण या माध्यमातून मराठी भाषा विषयक विविध उपक्रम सादर केले.   विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. उपजिल्हाधिकारी शेलार, किशोर बळी, सुरेश पाचकवडे, श्याम ठक यांनी विद्यार

जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

इमेज
  अकोला , दि.   २८ ( जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच सर्व योग संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.  रामदास पेठ येथील सांस्कृतिक भवन क्रीडा संकूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्मल सी.के. बडोला, डॉ. सतीश उंटागळे, डॉ. क्रीष्ण मुरारी शर्मा, संजय देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, श्रीमती एम.जी. ठाकरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, प्रशिक्षणार्थी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिता तिवारी यांनी केले.  निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे, अनिल डेंगाळे, अशोक वाठोरे आदींनी परिश्रम घेतले.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक :सोमवारी (दि.३०) मद्यविक्री बंद

अकोला , दि.   २८ ( जिमाका) – अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि. ३० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवर दि.३० रोजी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. ०००००

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश

  अकोला , दि.   २८ ( जिमाका) – अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि. ३० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुका निर्भय, शांततेत व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. आदेशात म्हटल्याप्रमाणे : ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे, त्‍या मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात सर्व पक्षांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्‍या कामा‍व्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे. ०००००

प्रजासत्ताक दिन उत्साहात ध्वजवंदन,संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भारावले अकोलेकर

इमेज
  अकोला , दि.   २६ ( जिमाका) – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. या सोहळ्यात झालेले ध्वजवंदन, पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर झालेले शानदार संचलन आणि देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उपस्थित अकोलेकर भारावले.   मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक   गोकुलराज यांच्या नेतृत्वात व पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलन करण्यात आले. त्यात विविध सुरक्षा व सेवा पथकांनी सहभाग घेतला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व सांघिक कवायती सादर केल्या. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ,   विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. मिनाक्षी गजभिये, अति, मुख्य कार्यकारी अधिका

सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल येथे शनिवारी सामुहिक सूर्यनमस्कार

इमेज
अकोला , दि .25   ( जिमाका )-    क्रीडा   व   युवक    सेवा   संचालनालय ,   महाराष्ट्र   राज्य   पुणे    अंतर्गत ,   जिल्हा   क्रीडा   परिषद , जिल्हा क्रिडा   अधिकारी   कार्यालया   अकोला , सर्व योगा संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था   यांचे   संयुक्त   विद्यमाने   शनिवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल, रामदास पेठ, अकोला येथे जागतिक   सुर्यनमस्कार    दिनानिमित्त ,   सामुहिक   सूर्य नमस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.                 या   कार्यक्रमामध्ये ,   एन . सी .   सी .   कॅडेट ,   स्काऊट   व   गाईड ,   शासकीय   पोलीस   प्रशिक्षण   केंद्राचे    प्रशिक्षणार्थी सांस्कृतिक   व   योग   केंद्र ,   योग   भारती ,   स्वयंसि द्धा , विविध    एकविध   खेळ   संघटनेचे   प्रतिनिधी ,   सर्व   व्यवस्थापनाचे   शालेय   व    महाविद्यालयीन   विद्यार्थी ,   शिक्षक ,   विविध   शासकीय   /   खाजगी   विभागाचे   अधिकारी   ,   कर्मचारी   ,   विविध    एकविध   खेळ   संघटनेद्वारा   राबविण्यात   येत    असलेल्या   क्रीडा   प्रशिक्षण   केंद्राचे   प्रशिक्षणार्थी