रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1053 चाचण्यात 167 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 10 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 1053 चाचण्या झाल्या त्यात 167 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोट येथे 62 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे 28 चाचण्या
झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
तेल्हारा येथे 18 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर
येथे 88 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 644 चाचण्या झाल्या
त्यात 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 80 चाचण्या झाल्या त्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 93 चाचण्या झाल्या त्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. अकोला येथे सात, अकोला आयएमए येथे सहा, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 24 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1053 जणांच्या
चाचण्या होऊन त्यात 167 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1
लक्ष 24 हजार 485 चाचण्या झाल्या पैकी 10833 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा