सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप परिमाणे निश्चित; मे महिन्यात मिळणार मोफत धान्य; लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 



अकोला,दि.5 (जिमाका)-  सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत  मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील व्यक्ती तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याअंतर्गत मे व जून महिन्यात  मोफत धान्य वितरण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या मोफत धान्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. मोफत धान्य वितरणाचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवावा,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले.

यासंदर्भात आज लोकशाही सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते पाटील, रामेश्वर पुरी, श्रीकांत देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभुमिवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कुणाचीही उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. त्याअंतर्गत राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त धान्याचे प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामिण भागात व शहरी भागातील गोरगरीबापर्यंत यंत्रणेने सक्षमपणे काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी मोफत धान्य वितरणाचे परिमाणांबाबत माहिती दिली. जिल्ह्याकरिता  माहे मे २०२१ करिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न  योजना व सार्वजनिक  वितरण  व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य जीवनावश्यक वस्तुचे वाटप  परिमाणे  खालील प्रमाणे  निश्चित करण्यात आले आहेत.

.क्र

धान्याचा प्रकार

वाटप परिमाण

धान्य वाटपाचे 

किरकोळ दर

  1.  

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु

  तीन किलो प्रति व्यक्ती

मोफत

  1.  

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ

दोन किलो प्रति व्यक्ती

मोफत

  1.  

अंत्योद् अन्न योजना गहू

15 किलो प्रति कार्ड

मोफत

  1.  

अंत्योदय अन्न योजना तांदुळ

 20 किलो प्रति कार्ड

मोफत

  1.  

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु

चार किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  दोन रुपये

  1.  

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ

एक  किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  तीन रुपये

  1.  

अन्नपुर्णा योजना

पाच किलो गहू व पाच प्रतिव्यक्ती

मोफत

  1.  

नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरीता

1 किलो प्रति शिधापत्रिका लहान मोठ्या भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार

प्रति किलो  20 रुपये

  1.  

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू व तांदुळ

प्रति सदस्य प्रतिमाह 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ

मोफत

  1.  

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत  अंत्योदय गटातील लाभार्थ्यांसाठी गहू व तांदुळ

प्रति सदस्य प्रतिमाह 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ

मोफत

  1.  

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत तुरदाळ, चणादाळ(अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुंटुबातील लाभार्थ्यासाठी) साठा उपलब्धतेनुसार

तुरदाळ, चणादाळ व चणाचे वाटप करताना प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम या तत्वानुसार परंतु प्राधान्याने अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे. त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना वाटप करण्यात यावे.

मोफत

             वरील वाटप परिमाण गोदामातील साठ्याचे  लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन