अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
अकोला,दि.10 (जिमाका)- जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवार दि. 9 चे
रात्री 12 वाजेपासून
ते शनिवार दि. 15 च्या रात्री 12 वाजेपर्यंत कडक निर्बंध जारी
केले आहेत.तथापि,अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना
त्यातून मर्यादित मुभा देण्याचे आज जारी केलेल्या आदेशानुसार जाहीर केले आहे.
हे आदेश रविवार दि. 9 रोजीचे रात्री 12 वाजेपासुन ते शनिवार दि. 15 चे रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहतील.
मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे-
1) पेट्रोल पंप - ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन
सकाळी आठ ते सकाळी 11 या कालावधीत केवळ शेतकऱ्यांना
त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर
घेवून येणाऱ्या शेतकऱ्याला इंधन पुरवठा करता येईल.
2) सर्व बॅंका ह्या रुग्णायलये, गॅस वितरण
सेवा, ऑक्सीजन, औषधी, वैद्यकीय सेवा,मागणीनुसार पुरवठा
व्हावा, या
करिता संबंधीत कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता दि. 12 ते 15 चे सकाळी 11 ते दुपारी एक या दरम्यान वेळ देण्यात
येत आहे.
3) दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत,
पारेषण इत्यादी सेवासुरळीतपणे रहावी या करिता सेवा पुरविणारे
कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये
त्यांना कामे करता येतील. संबंधीत आस्थापनानी त्यांना वितरीत केलेले
ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
4) धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरु राहण्यासाठी
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.
5) वृत्तपत्र वितरण संदर्भानेवाहतूक
अनुज्ञेय राहील. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
6) आस्थालपना/कार्यालये–
कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं.,विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युत
पुरवठा , महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, धरण
व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य विभाग,महसूल प्रशासन,
महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत,कृषी विभाग, पशुसंवंर्धन,
जिल्हा माहिती अधिकारी
कार्यालय तसेच अत्यावश्यक कामकाजाकरिताव कोविड चे अनुषंगाने कामकाज करण्यासाठी
आवश्यक असणारे विभाग, कार्यालये ही सुरु राहतील, असे आदेशात
नमूद करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा