औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण
मुंबई,दि. 5- महाराष्ट्र शासनाने औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक राज्यासाठी
तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठीच्या वेब पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांच्याहस्ते मंत्रालयातील
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष
सभागृहात ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले.
याप्रसंगी उद्योग मंत्री ना.श्री सुभाष देसाई, उद्योग
राज्य मंत्री ना. श्रीमती आदिती तटकरे ऑनलाईन उपस्थिती होते. या उद्घाटन समारंभास अपर मुख्य सचिव (नियोजन
विभाग) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव
(उद्योग विभाग) श्री. बलदेव सिंह, संचालक (अर्थ व
सांख्यिकी संचालनालय) श्री. र.र.
शिंगे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, अर्थ व
सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यांनी औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करावा अशी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची शिफारस आहे. राष्ट्रीय सांख्यिकी
कार्यालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्थ व सांख्यिकी
संचालनालय औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करणार असून अर्थ व सांख्यिकी संचालनालय आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यासाठी
औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणना करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग विषयक महत्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होईल. राज्याच्या औद्योगिक
विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे,राज्याचे
औद्योगिक धोरण निश्चित करणे,औद्योगिक
विकासाच्या योजना ठरविणेयासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढ उताराचे मोजमापण्यासाठी या वेब पोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उद्योगमंत्री मा.ना. श्री. सुभाष
देसाई यांनी
व्यक्त केला.
उद्योग
क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून देशाच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये (GDP) राज्याचा जवळपास 14 टक्के इतका वाटा तर देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात राज्याचा जवळपास 15 टक्के इतका वाटा आहे. औद्योगिक
प्रगतीचे मापन औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने करता येते. देशाच्या उत्पादन वाढीचा वेग, राज्या-राज्यातील उत्पादन वाढीची तुलना करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या
निर्देशांकामुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल विचारात घेऊन राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरविणे, ते
प्रभावीपणे राबवणे, तसेच
धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी
या पोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असा
विश्वास उपमुख्यमंत्रीना श्री. अजित
पवार यांनी वेब पोर्टलच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला. गेल्या
सव्वा वर्षाच्या कोरोना विषाणू संक्रमणाचा संपुर्ण जग, देश
तसेच राज्य लढाई करीत आहे. कोरोना
संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्याने कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे
उद्योग तसेच व्यापार क्षेत्रावर याचा परिणाम झाला असून अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. उद्योग
क्षेत्रावर झालेला व होणारा
परिणाम विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सदर निर्देशांकाचा उपयोग होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा