पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ - डॉ. दिलीप रणमले

  जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ -          डॉ. दिलीप रणमले अकोला, दि. 31 : जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली असून, दि. 13 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आरोग्य सहायक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.         कुष्ठरूग्णांकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. नियमित उपचार घेणा-या रुग्णांपासून इतरांना मुळीच अपाय नाही हे माहित असूनही सुशिक्षीत व्यक्तीही त्यांना टाळतात. ही हीनतेची भावना नष्ट व्हावी आणि हा रोग औषधोपचाराने विकृती न येता पूर्णपणे बरा होतो हा संदेश जनमानसावर ठसवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानात घरोघरी सर्वेक्षण करुन नविन कुष्ठरूग्णांचा शोध घेतला जाईल, जुन्या रूग्णांना भेटून नियमित उपचार घेतल्याची खातरजमा करणे, विकृती प्रतिबंधक सल्ला व सेवा देणे आदी कामे केली जातील. त्याचप्रमाणे, कुष्ठरूग्णांना शासनाच्या एस.टी. व रेल्वे मोफत प्रवास योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना आदी योजनांची माहिती दिली जाईल

हेल्मेट वापर जागृती भित्तीपत्रकाचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
  हेल्मेट वापर जागृती भित्तीपत्रकाचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन अकोला, दि. 31 : वाहनांचे वाढते अपघात आणि त्यात होणारी हानी टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर ही काळाची गरज आहे, असे जिल्हाधिकारी तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अजित कुंभार यांनी सांगितले. ‘रेडक्रॉस’तर्फे हेल्मेट जागृतीबाबत तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. संस्थेचे मानद सचिव प्रभजीतसिंह बछेर, ॲड. सुभाषसिंह ठाकूर,   सनदी लेखापाल मनोज चांडक व इतर सदस्य उपस्थित होते. हेल्मेट सक्तीसाठी व्यापक जागृती आवश्यक असून रेडक्रॉस सोसायटीने यासाठी पुढाकार घेऊन चांगले कार्य केले आहे, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले. हेल्मेटची ‘एचईएलएमईटी’ ही अक्षरे सार्थ आहेत. त्यानुसार हेड, आईज, लिप्स, माऊथ, इयर्स, टीथ या सर्व अवयवांना सुरक्षितता मिळते, हेल्मेटच्या वापराबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचाही आग्रह असून, त्यांच्या भूमिकेला विविध संस्था आणि जागरूक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. बछेर यांनी यावेळी केले. ०००

बार्शीटाकळी तालुक्यातील दोन संस्था अंतरिम अवसायनात

  बार्शीटाकळी तालुक्यातील दोन संस्था अंतरिम अवसायनात अकोला, दि. 31 : सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात ठरविण्यात आल्या असून, तशी नोटीस जारी करण्यात आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील बजरंग मजूर सहकारी संस्था, तसेच बार्शिटाकळी येथील पटवारी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था या दोन संस्था अवसायनात काढण्याबाबत अंतरिम आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या संस्थांनी स्पष्टीकरण अथवा हरकती 30 दिवसांच्या आत लेखी किंवा बार्शीटाकळी येथील सहायक निबंधक कार्यालयात उपस्थित राहून सादर कराव्यात अन्यथा अंतिम आदेश काढण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधक ए. एस. शास्त्री यांनी दिला आहे. ०००

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत अकोला जिल्ह्याचा समावेश जिल्ह्यात 25 हजार घरांवर होणार ‘सुर्योदय' योजनेतून ऊर्जानिर्मिती - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत अकोला जिल्ह्याचा समावेश जिल्ह्यात 25 हजार घरांवर होणार ‘सुर्योदय' योजनेतून ऊर्जानिर्मिती -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 31 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'सुर्योदय' योजनेत राज्यातील सात जिल्ह्यांत अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील 25 हजार घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.     केंद्र शासनाकडून सौर पॅनेलसाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. देशात एक कोटी घराच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेली 'सुर्योदय'   योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. योजनेत राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूरबरोबरच   अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात 25 हजार घराच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ऊर्जेचा उत्तम

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार -       जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला ,  दि.  30 :   जिल्हा वार्षिक योजनेत नियोजनानुसार विहित कालावधीत निधी खर्च होणे आवश्यक आहे. विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल ,  असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिला. जिल्हा वार्षिक योजनांबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली ,  त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी ,  निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की ,  विकासकामांवरील नियोजित निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. अनेक विभागांकडून अद्यापही प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.  पशुसंवर्धन ,  मत्स्यव्यवसाय विभाग अशा कृषीपूरक व्यवसायांशी संबंधित विभागांकडून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगली विकासकामे व अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तथापि ,  त्यानु

शेगावात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी; 1 हजार 227 पदांसाठी भरती होणार

  शेगावात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23  कंपन्या सहभागी ; 1  हजार  227  पदांसाठी भरती होणार ऑनलाईन नोंदणीसाठी  www.rojgar.mahaswayam.gov.in   संकेतस्थळ   अकोला ,  दि.  30   : कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता ,  विभागीय आयुक्तालय ,  विद्यार्थी विकास विभाग ,  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय ,  शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या  2  फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय ,  शेगाव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील  23  कंपन्या ,  उद्योगसमूह ,  कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे  1  हजार  227  कुशल ,  अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा ,  असे आवाहन कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता उपायुक्त  द. ल. ठाकरे यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि. , पिपल ट्री व्हेंचर प्रा.लि. ,  ए.जी.एस इंशुरन

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; जिल्हाधिका-यांची गोपाळखेड येथील शाळेला भेट लोकसहभागातून शाळा समृद्ध कराव्यात - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; जिल्हाधिका-यांची गोपाळखेड येथील शाळेला भेट लोकसहभागातून शाळा समृद्ध कराव्यात - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 30 :  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळांमध्ये आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा अधिकाधिक सुंदर व समृद्ध होण्यासाठी या उपक्रमात विविध क्षेत्रांतील संस्था, व्यक्तींनाही सहभागी करावे. लोकसहभागातून शाळा अधिक समृद्ध कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज गोपाळखेड येथे केले.  शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिका-यांनी आज गोपाळखेड येथील जि. प. केंद्रिय वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जि. प. मुख्य कार

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  जिल्हाधिका-यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा विकासकामांचा निधी अखर्चित ठेवल्यास जबाबदारी निश्चित करणार -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 30 :   जिल्हा वार्षिक योजनेत नियोजनानुसार विहित कालावधीत निधी खर्च होणे आवश्यक आहे. विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिला. जिल्हा वार्षिक योजनांबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, विकासकामांवरील नियोजित निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. अनेक विभागांकडून अद्यापही प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.   पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विभाग अशा कृषीपूरक व्यवसायांशी संबंधित विभागांकडून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चांगली विकासकामे व अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तथापि, त्यानुस
                 शेगावात शुक्रवारी  पं. दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी; 1 हजार 227 पदांसाठी भरती होणार ऑनलाईन नोंदणीसाठी  www.rojgar.mahaswayam.gov.in   संकेतस्थळ   अमरावती, दि. 29 :  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 23 कंपन्या, उद्योगसमूह, कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे 1 हजार 227 कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त  द. ल. ठाकरे यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि.,पिपल ट्री व्हेंचर प्रा.लि., ए.जी.एस इंशुरन्स, पेटीएम, जाधव ग्रुप ऑ

महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू; समित्या गठित

  महासंस्कृती महोत्सवाची तयारी सुरू; समित्या गठित अकोला, दि. 30 : जिल्ह्यात दि. 12 ते 16 फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव घेण्याचे नियोजन असून, जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. महोत्सवाच्या समन्वय व संनियंत्रणासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून, त्यात जि. प. सीईओ, पोलीस आयुक्तांसह अनेक अधिका-यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून, अशासकीय सदस्यांमध्ये डॉ. गजानन नारे, सीमा शेट्ये, किशोर बळी, प्रशांत असनारे, प्रा. मधु जाधव, गीताबाली उजवणे, रमेश थोरात, दिलीप देशपांडे, सचिन गिरी, पुष्पराज गावंडे यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप कार्यक्रम समिती गठित करण्यात आली असून, त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व इतर अधिका-यांचा समावेश आहे. अप्पर जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत. त्याचप्रमाणे, प्रचार व प्रसिद्धी समिती, साहित्यिक उपक्रम समिती, महिला समिती, सूत्रसंचालन समित

जिल्ह्यातील शेतक-यांना देशाबाहेर अभ्यास दौ-यात सहभागी होण्याची संधी

  जिल्ह्यातील शेतक-यांना देशाबाहेर अभ्यास दौ-यात सहभागी होण्याची संधी अकोला, दि. 30 : विविध देशातील विकसित शेती तंत्रज्ञानाबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा व क्षेत्रीय भेटीतून शेतक-यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा या योजनेसाठी जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. अभ्यास दौ-यासाठी शेतक-याचा चालू कालावधीचा सातबारा व आठ अ असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे. शेतकरी कुटुंबातून एकालाच लाभ घेता येईल. आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा, तसे प्रमाणपत्र जोडावे. सहलीला निघण्याच्या आधी वय 25 वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. शेतकरी पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. त्याची

तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर; निवड यादीतील उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

  तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर; निवड यादीतील उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अकोला, दि. 30 : तलाठी पदभरतीसाठी निवड यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्याचा निकाल जिल्हा प्रशासनाच्या akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीला हजर राहावे. ऑनलाईन अर्जाची प्रत, आधारपत्र, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड, वाहन परवाना, तसेच ऑनलाईन अर्जात नमूद केलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीचा एक संच आणि पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००  

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावा - व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावा -          व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे अकोला, दि. 30 :   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून   मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांनी येथे केले. महामंडळाचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी जि. प. कर्मचारीभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, अधिकारी- कर्मचारी व मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सांगळे म्हणाले की, मातंग व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक उन्नती, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी   महामंडळाकडून सुविधा कर्ज योजना, महिला समृद्ध योजना, शैक्षणिक कर्ज योजना, थेट कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना आदी अनेक योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा. श्री. म्हस्के यांनी विविध योजनांची माहिती यावेळी दिली. ए. वाय. वाडिवे यांनी सूत्रसंचालन केले. ०००

स्वाधार योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत

  स्वाधार योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत अकोला, दि. 29 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास दि. 31 जानेवारीपर्यंत मुदत असून, विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे ते अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज वाटप तसेच अर्ज स्वीकृतीसाठी दि. 31 पर्यंत मुदत देण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (निमवाडी), पोलीस वसाहत दक्षता नगर येथे कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. ०००

पशुधनाचे टॅगिंग करून घेण्याबाबत आवाहन

  पशुधनाचे टॅगिंग करून घेण्याबाबत आवाहन अकोला, दि. 29 : दुग्ध उत्पादक शेतक-यांना दूधासाठी प्रतिलिटर पाच रू. अनुदान दिले जाते. त्यासाठी पशुधनाचे टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीत नोंदणी आवश्यक आहे. पशुपालक व शेतकरी बांधवांनी पशुधनास टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.   पशुधनाचे टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी अभियान राबविण्याची सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यानुसार सर्व पशुवैद्यकीय संस्थांमध्ये टॅगिंग व नोंदणी सुरू आहे. पशुपालक बांधवांनी पशुधनाला टॅगिंगचे काम पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.   ०००

स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद

  स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपट्टीची थकबाकी न भरल्यास पुरवठा बंद   पाटबंधारे विभागाचा इशारा अकोला, दि. 29 : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांनी वेळेवर पाणीपट्टीचा भरणा न केल्याने थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. किमान 50 टक्के रक्कम तत्काळ न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा अकोला पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची मार्च 2024 पर्यंत 28 कोटी 24 लक्ष 83 हजार रू. आकारणी होत असून, केवळ 2 कोटी 62 लक्ष 68 हजार रू. वसुली झाली आहे. मार्च 2024 पर्यंत 25 कोटी 62 लक्ष 15 हजार रू. इतकी आकारणी अपेक्षित आहे. पाणीपट्टी भरणा करण्यास जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान 50 टक्के पाणीपट्टी भरणा करावा अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 अन्वये पाणीपुरवठा बंद करण्यात येईल व संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील, असा इशारा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. खु. वसुलकर यांनी दिला आहे 000

जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

इमेज
  जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण अकोला, दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी निवासस्थानी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वजवंदन, राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर जिल्हाधिका-यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, गायत्री बालिकाश्रम, सूर्योदय, शासकीय बालगृहातील मुलांना खाऊवाटप करण्यात आले, महिला बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, सुनील लाडुलकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक मोहन साठे, गजानन गवई आदी उपस्थित होते. ०००  

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इमेज
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा अकोला दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिका-यांनी अधिकारी, कर्मचारी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. ०००००  

प्रजासत्ताक दिन सोहळा; विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन

इमेज
  प्रजासत्ताक दिन सोहळा; विविध दलांच्या सादरीकरणाला उपस्थितांची दाद विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधन परंपरेचे दर्शन अकोला, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात विविध सुरक्षा दले, शाळा, महाविद्यालये, संस्थांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख अशा विविध महापुरूषांच्या वेशभूषेत त्यांचा संदेश प्रसारित करत महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या परंपरेचे दर्शन घडवले. जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, गृहरक्षक दल, राष्ट्रीय विद्यार्थी सेना, स्काऊट- गाईड यांनी शिस्तबद्ध कवायतीचे सादरीकरण केले, पोलीस वाद्यवृंद पथक, श्वानपथक, नॅशनल मिलिट्री स्कूल, बिनतारी संदेश विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग आदींनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. ‘भारतमाता की जय’च्या जयघोषाने आसमंत नि

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा संविधानातील मूल्यांची जोपासना करून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा संविधानातील मूल्यांची जोपासना करून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती -           जिल्हाधिकारी अजित कुंभार  अकोला, दि. 26 : भारतात सात दशकांहून अधिक काळ लोकशाही  दृढपणे टिकून व वृद्धिंगत होत आहे. हा विकसनशील देश महासत्ता होण्याकडे निर्धाराने वाटचाल करत आहे. संविधानातील न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता या मूल्यांची जोपासना करत शासन-प्रशासनाकडून सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती देण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी यावेळी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले. देशासाठी योगदान देणारे हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक, महापुरूष