2717 अहवाल प्राप्त, 508 पॉझिटीव्ह, 459 डिस्चार्ज, ११ मृत्यू

 अकोला,दि.6(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2717 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2209  अहवाल निगेटीव्ह तर 508 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान  459   जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 172 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ४३८०१(३३५७६+१००४८+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 508+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 172= एकूण पॉझिटीव्ह- 680.

         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 218587 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 215665 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2535 नमुने होते. आजपर्यंत एकूण 218515  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 184939   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

508 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ५०८ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २०४ महिला व ३०४ पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-मुर्तिजापुर-५९, अकोट-११, बाळापूर-५०, तेल्हारा-२८, बार्शी टाकळी-२६, पातूर-४४, अकोला-२९०. (अकोला ग्रामीण-७५, अकोला मनपा क्षेत्र-२१५)दरम्यान काल (दि.5) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 172 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

11णांचा मृत्यू

आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पातूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. ५ मे रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर निंबी ता.बार्शीटाकळी येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, बाबुळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते. सौदांळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते.  रामटेकपूर ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. कोथाली खु. ता.बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ५ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, मुंडगाव ता.अकोट येथील ३० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  459 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील सहा, उसाई हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, होले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३९० असे एकूण ४५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला., अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6187 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ४३८०१(३३५७६+१००४८+१७७) आहे. त्यात 754 मृत झाले आहेत. तर 36860 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6187 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :