रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १८९२ चाचण्यात १७३ पॉझिटीव्ह
अकोला,दि.२१ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२०) दिवसभरात झालेल्या १८९२ चाचण्या झाल्या त्यात १७३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे ९४ चाचण्या झाल्या
त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर
येथे २२० चाचण्या झाल्या त्यात १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शी टाकळी येथे १३५ चाचण्या
झाल्या त्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे १२२ चाचण्या झाल्या
त्यात १३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे १८२
चाचण्या झाल्या त्यात २२ जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे १६१ चाचण्या झाल्या त्यात २० जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे ७७५ चाचण्या झाल्या त्यात ३० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अकोला आयएमए
येथे १६ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २३
चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६३ चाचण्या
झाल्या त्यात २४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे १०१ चाचण्या झाल्या त्यात ३४ जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. असे १८९२
जणांच्या चाचण्या होऊन त्यात १७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात १ लक्ष ४० हजार ६०१ चाचण्या झाल्या पैकी १२८१७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा