पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोविडः ‘शुन्य पॉझिटीव्ह’

    अकोला दि. 31 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) एकाचा अहवाल प्राप्त झाला.   त्यात कोणाचाही अहवाल   पॉझिटीव्ह आला नाही,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0   व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0. आरटीपीसीआर ‘शुन्य’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘20’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66130(49997+15142+991) आहे. तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 20   सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील   पाच   रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 15 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती    जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे 00000

एक दिवशीय कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन; रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी

इमेज
अकोला , दि.31(जिमाका)-   विधी संघर्ष ग्रस्त बालकांना रोजगारांच्या संधी निर्माण व्हावे याकरिता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध विषयावर विधी संघर्ष ग्रस्त बालकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेतच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध झाली असून रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.             बाल न्याय मंडळ व एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहाश्रय, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन समुपदेशन केंद्र येथे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन शिबीर पार पडले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीस सुवर्णा केवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा न्यायाधीस शयना पाटील, सुनील पाटील, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक द.ल.ठाकरे, बालहक्क आयोगाचे ॲड. संजय सेंगर, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष शुभांगी यादव, बाल न्याय मंडळ व बालकल्याण समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.             मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाले की, शासनाव्द

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व” उपक्रम,

अकोला , दि.31(जिमाका)-   एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तीं यांची जयंती असुन 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि. 1 एपिल ते 1 मे 2023 या   महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘ सामाजिक न्याय पर्व ’ हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाव्दारे राबविण्यात येत आहे. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. या कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करणे, राज्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार

शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

इमेज
  अकोला दि.३१(जिमाका)-   शेतीच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेतांना परिश्रमाची जोड असल्यास शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक समृद्धी हमखास येतेच. वाघझाडी येथील नितीन भास्कर इंगळे यांनी शासनाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेत पारंपारिक शेतीला पशुपालनाची जोड देत आर्थिक समृद्धी साध्य केली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील वाघझाडी हे गाव. या गावातील नितीन भास्कर इंगळे हे शेतकरी. आधीच खारपाणपट्टा असल्याने संपर्ण कोरडवाहू क्षेत्र. अकोला जिल्ह्याचे उष्ण व प्रतिकूल हवामान.     अशा परिस्थितीत इंगळे कुटुंब आपल्या पारंपारिक शेतीत कापूस, सोयाबीन हे पिक   घेत गुजराण करीत होते.   मात्र हवे तसे उत्पन्न होत नव्हते. जेमतेम पावणे दोन लाखांपर्यंत उत्पन्न जाई. अखेर इंगळे यांनी   शासनाच्या नाविन्यपुर्ण योजनेतून पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरे वाटप योजनेचा लाभ घेतला. त्यांना त्यातून दोन म्हशी मिळाल्या. या म्हशी पालनात त्यांना रुची निर्माण झाली. दुधाचे उत्पन्न अधिक शेणखताचे उत्पन्न. हेच शेणखत स्वतःच्या शेतात ते टाकत गेले. पावणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या शेतातून त्यांना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार

अकोला , दि.31(जिमाका)-   वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्‍यात येत आहे. या अभियानातंर्गत थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त रुग्णांवर औषधोपचार केला जाणार आहे. याकरिता दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैधकशास्त्र विभागात विशेष थायरॉईड ओपीडी चालविली जाणार आहे. या सुविधेचा थायरॉईड रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांनी केले.             थायरॉईड रोगासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. त्यानुसार दि. 30 मार्चपासून संपूर्ण राज्यात दर गुरुवारी विशेष थायरॉईड ओपीडी चालविली जाणार आहे. यामध्ये थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचार व दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे परिणाम जसे. अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे, विविध कॅन्सर यासंबंधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करुन दिली जाणार आहे.             थायरॉईड अभियानाची सुरुवात

बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता

इमेज
अकोला , दि.31(जिमाका)-   एक व्यक्ती अचानक बार्शीटाकळी रेल्वेस्थानकावर जखमी अवस्थेत आढळतो. तो बेवारस म्हणूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे पोलिसांमार्फत दाखल होतो. डोक्याला मार लागल्याने त्याला काहीच आठवत नाही. महिनाभराचा उपचार,सुश्रूषा, समुपदेशनानंतर तो पूर्ण बरा होतो, आता प्रश्न येतो त्याला सोडायचे कुठे? दरम्यान त्याला काहीही आठवत नाही. पण सारखा आईकडे जायचे असा पाढा लावलेला. आणि मग सुरु होते एक तपास यात्रा आणि आई लेकराची भेट पुन्हा घडवित अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहृदयतेचा प्रत्यय देतात. बार्शीटाकळी येथील रेल्वेस्थानकावर दि.26 फेब्रुवारी रोजी एक 40 वर्षीय रुग्ण जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर असल्याचे निदर्शनात आले. हा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता त्याच्या डोक्याला व शरीराच्या बऱ्याच भागात गंभीर जखमा झाल्या होत्या.   रेल्वे पोलीसांनी त्या रुग्णाला तातडीने उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलीसांच्या तत्परतेने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयत्नाने त्या रुग्णाचा जीव वाचविण्यात आला. दाखल झाला त्यावेळी या रुग्णाची अवस

पोलीस भरती परिक्षा; शहरातील पर्यायी मार्गाने वाहतूक

अकोला , दि.30(जिमाका)-   जिल्हा पोलीस विभागाव्दारे पोलीस भरती लेखी परिक्षा रविवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपासून आयोजीत करण्‍यात आली आहे. त्याअनुषगाने लेखी परिक्षा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणे तसेच वाहतुकीचा अडथळा होऊ नये याकरिता अकोला शहरातील लक्‍झरी बसस्‍टॅण्‍ड ते सरकारी बगीचा या मार्गावरील जाणे व येणारी सर्व प्रकारची वाहतूक रविवार दि.2 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 2 एप्रिलचे 12.00 वाजे पर्यंत पुर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने सर्व प्रकारच्या वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. आदेशात म्हटल्याप्रमाणे रविवार (दि.2) रोजी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत लक्‍झरी बसस्‍टॅण्‍ड- निमवाडी पोलीस वसाहत समोरुन-जेल चौक-अशोक वा‍टिका-शासकीय रुग्‍णालय-जिल्‍हाधिकारी कार्यालय-सरकारी बगीचा या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 000000

कोविडः ‘सहा’ पॉझिटीव्ह

      अकोला दि. 30 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 46 जणांचे   अहवाल प्राप्त झाले.   त्यात सहा जणांचे अहवाल   पॉझिटीव्ह आ ले ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 6   व खाजगी 0)6+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 6. आरटीपीसीआर ‘सहा’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन प्रमाणे रहिवाशी आहे,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘23’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66130(49997+15142+991) आहे. तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 23   सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील   सहा   रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 17 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती   

लिंबू आणि सिताफळाने आणली आर्थिक समृद्धी

इमेज
  अकोला दि.30(जिमाका)-   अथक मेहनत आणि शास्त्रीय दृष्टीकोनाचा अवलंब केल्यास शेतीसारखा फायद्याच्या व्यवसाय नाही, असे सांगतात पुनोती बु. ता. बार्शीटाकळी येथील शेतकरी   गजानन मोतिराम महल्ले. महल्ले यांनी आपल्या तुलनेने हलक्या प्रतिच्या जमिनीत लिंबाची बाग केली आहे. शिवाय नुकतीच त्यांनी उर्वरित क्षेत्रात सिताफळ बाग केली आहे.   लिंबाच्या बागेतून वर्षाला   ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत असते, असे त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या योजनांमुळे झाला लाभ हे सगळं त्यांना शक्य झाले ते कृषी विभागाच्या विविध योजनांमधून. लिंबाची बाग त्यांनी महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतून मिळाली. त्यात त्यांनी २ एकर ७ गुंठे क्षेत्रात   लिंबाची झाडे लावली. संपूर्ण बाग त्यांनी ठिबक खाली घेतलाय. या शिवाय त्यांनी सेंद्रीय खतांचा वापर, बागेची नीट निगा राखणे, झाडांची वेळेवर छाटणी करणे इ. उपाययोजना केल्याने आज त्यांच्या बागेतील लिंबू बाजारात प्रसिद्ध झालाय. महल्लेंचा लिंबू म्हणून हा लिंबू अकोला, कारंजा, पिंजर या ठिकाणच्या बाजारात प्रसिद्ध आहे. मोठा आकार, भरपूर रस हे त्यांच्या लिंबाचे वैशिष्ट्य आहे. त

कोविडः ‘पाच’ पॉझिटीव्ह

    अकोला दि. 29 (जिमाका)-   आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 77 जणांचे   अहवाल प्राप्त झाले.   त्यात पाच जणांचे अहवाल   पॉझिटीव्ह आ ले ,   असे   जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5   व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5. आरटीपीसीआर ‘पाच’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील तीन व उर्वरित दोन रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे,   अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. सक्रिय रुग्ण ‘20’ जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66124(49991+15142+991) आहे. तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 20   सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील   सहा   रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 14 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहि

जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई; धामणा व वाघजाळी येथे रोखला बालविवाह

             अकोला दि.29(जिमाका)- अकोला तालुक्यातील धामणा व   वाघजाळी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील   अल्पवयीन बालीकेचा बालविवाह रोखण्याची कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या केली, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बालसंरक्षण कक्षाला माहिती मिळाली की, धामणा ता.अकोला येथे बुधवार दि.22 मार्च रोजी व बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी वरखेड येथे सोमवार दि. 27 मार्च रोजी अल्पवयीन मुलीचा बालविवाह   होऊ घातला आहे,अशी माहिती बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार बालिका 18 वर्षांपेक्षा कमी वयाची खात्री करुन तिच्या नातेवाईकांना बालविवाह अधिनियम 2006 अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीचा विवाह ती 18 वर्षांची पूर्ण होईस्तोवर करणार नाही असे लेखी हमी पत्र पालकांकडून घेण्यात आले व विवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, धामणा गावाचे सर

वन क्षेत्रातील 'कुरणाचे कुंपण'करणार 'शेताची राखण'

इमेज
  अकोला दि. २९  (डॉ. मिलिंद दुसाने)-  ‘ कुंपणानेच शेत खाल्ले' ही एक प्रचलित म्हण...आणि वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान ही शेतकऱ्यांच्या परिश्रमावर पाणी फिरवणारी बाब. वारंवार उद्भवणाऱ्या या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीतच 'कुरण विकास कार्यक्रम'  वन विभाग राबवित आहे. आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून हे वनांतील 'कुरणांचे कुंपण शेताची राखण' करणार आहे. वन्यजीव शेतात शिरुन पिके खातात वा रानडुकरांसारखे प्राणी नासाडीही करतात. शेतकऱ्यांसाठी हा मोठा संघर्षाचा प्रसंग असतो. याच मुद्यावरुन वन विभागालाही शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. रहदारीचे नियम वा प्रवेश बंदी या सारख्या उपाययोजना वन्य प्राण्यांवर कशा लादायच्या? त्या तशा अशक्यच. पण ज्या अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शेतीकडे वळतात ते अन्न म्हणजेच 'गवत' त्यांना वन हद्दीतच उपलब्ध व्हावे,यासाठी वन विभागाने कुरण विकास कार्यक्रम राबविला आहे. अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात  ९० हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टर वनक्षेत्रावर वन्य प्राण्यांचे खाद्य असणारे गवत लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. सन २

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

इमेज
             मानवी आहारातील   पोषक तत्वाच्या कमतरतेने निर्माण   होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक   तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी पौष्टिक   तृणधान्य ही काळाजी गरज असून त्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.     त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’साजरे करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीसह २४ विभागाच्या सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला, भाषण इ. स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘पौष्टिक   तृणधान्य   दिन’             वर्षारंभी   मकर संक