1468 अहवाल प्राप्त, 344 पॉझिटीव्ह, 552 डिस्चार्ज, 19 मृत्यू

            अकोला,दि.17(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1468 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1124  अहवाल निगेटीव्ह तर 344 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 552  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 19 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 115 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५०७३१(३८४६७+१२०८७+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 344+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 115= एकूण पॉझिटीव्ह- 459.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  242067 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 239083 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2594 नमुने होते. आजपर्यंत एकूण 241858 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 203391 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

344 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३४४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४२ महिला व २०२ पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-२०, अकोट-९४, बाळापूर-०२, तेल्हारा-३०, बार्शी टाकळी-२९, पातूर-७३, अकोला-९६. (अकोला ग्रामीण-३८, अकोला मनपा क्षेत्र-५८)

           दरम्यान काल (दि. 16) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 115 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

 

552 जणांना डिस्चार्ज

          दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९,बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून तीन,  केअर हॉस्पिटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक,  आधार हॉस्पिटल येथून सात,  आयकॉन हॉस्पिटल येथुन  सहा, ओझोन हॉस्पिटल येथून  एक, हॉटेल रिजेन्सी येथून  चार, बिहाडे हॉस्पिटल येथून  दोन,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, इंदिरा हॉस्पिटल   येथून तीन, देशमुख हॉस्पिटल येथून एक, के.एस. पाटील हॉस्पिटल येथून दोन, अथर्व हॉस्पिटल येथून एक, सोनोने हॉस्पिटल येथून तीन, काळे हॉस्पिटल येथून  दोन, सौमित्र हॉस्पिटल येथून दोन,  युनिक हॉस्पिटल येथून एक,  अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन,  क्रिस्टल हॉस्पिटल येथून दोन,  यकीन हॉस्पिटल येथून एक, बबन हॉस्पिटल येथून तीन, गोयंका हॉस्पिटल येथून तीन, पॉलिटेक्निक कॉलेज मुर्तिजापूर येथील ४१, मुलींचे वसतीगृह देवरी अकोट येथून ५०, खैरे उम्मत हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, गोपाळराव खेडकर कॉलेज तेल्हारा येथील १४,  समाज कल्याण वसतीगृह अकोला येथून पाच, लोहाना हॉस्पिटल येथून एक  तर होम आयसोलेशन मधील ३४२ असे एकूण ५५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

19 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे.

त्यात,

बाळापूर येथील ८० वर्षीय महिला असून ही महिला दि.१० रोजी दाखल झाली होती. तांदळी ता. पातूर येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते.डाबकी रोड येथील ४५ वर्षीय महिला असून  ही महिला दि.१३ रोजी दाखल झाली होती.बाळापूर येथील  ७५ वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१५रोजी दाखल केले होते. तेल्हारा येथील ३४ वर्षीय ,महिला असून  या महिलेस दि.१२ रोजी दाखल केले होते. अकोट येथील ५४ वर्षीय महिला असून या महिलेस दि.५ रोजी दाखल केले होते.रतनलाल प्लॉट अकोला येथील  ६७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१० रोजी दाखल केले होते.केशवनगर येथील ५९ वर्षीय महिला असून या महिलेस दि.५ रोजी दाखल केले होते.अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१२ रोजी दाखल केले होते.मोठी उमरी येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास मृतावस्थेत दाखल केले होते.म्हैसपूर येथील  ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते. पारस येथील ७५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले होते.जवाहर नगर येथील ७४ वर्षीय महिलेस मृतावस्थेत दाखल केले होते.डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिलेस मृतावस्थेत दाखल केले होते.दहिहांडा येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१४ रोजी दाखल केले होते.डोंगरगाव ता. बाळापूर येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२६ एप्रिल रोजी दाखल केले होते.वाडेगाव ता. बाळापूर येथील  ३८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.४ रोजी दाखल केले होते. तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्ण असून दि.१० रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6663 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या ५०७३१(३८४६७+१२०८७+१७७)  आहे. त्यात 927 मृत झाले आहेत. तर 43141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6663 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

००००००००००००

*महत्त्वाची माहितीः-*

*कोविड रुग्णांसाठी उपलब्ध बेडबाबत*

*माहिती खालील लिंकवर  उपलब्ध आहे.*

https://covid19akola.in/

०००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ