रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1128 चाचण्यात 115 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 17 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.16) दिवसभरात झालेल्या 1128 चाचण्या झाल्या त्यात 115 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात तेल्हारा येथे 93 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 85 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे 721 चाचण्या झाल्या त्यात 48 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 78 चाचण्या झाल्या त्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 89 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच अकोट येथे 39, बाळापूर येथे चार, बार्शीटाकळी येथे एक, अकोला आयएमए येथे एक, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 17 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. असे 1128 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 115 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 33 हजार 732 चाचण्या झाल्या पैकी 12166 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा