पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

इमेज
अकोला , दि . 2 9 ( जिमाका )-  समाजातील विधवा, परिपक्वता व  एकल महिलासाठी शासनाच्या विविध योजना आहे. एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात आयोजीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियासोबत संवाद साधण्यासाठी आयोजीत   संवाद मेळावा कार्यक्रमात त्या बोलत होते.   यावेळी जिल्हा परिषद सदस्य   अर्चना राऊत,   सेवानियुक्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर,   माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार नातेकोद्दीन खतीब, हिदायत पटेल, विजय अभोरे, बबनराव चौधरी, देवानंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.   आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना धीर देतांना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे, झटकून टाकावे व   पुन्हा उमेदीने उभे राहावे, संकटाला सामोरे जावे अशा शब्दात त्यांनी धिर दिला.   विचारांची व कार्याची भुक लागली पाहिजे तर सर्व संकटे आत्म सन्मानाने दुर होतील शासनाला आत्महत्याग्रस्त   शेतकरी , शेतमजूर महिलासाठी काय करता येईल.   यासाठ

मक्यावरील नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

अकोला , दि . २७ ( जिमाका )- सद्यस्थितीत मका हे पिक सुरूवातीच्या   पोंगे अवस्थेत  असून या अवस्थेत लषकरी अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते , त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना कराव्या , असे आवाहन जिल्हाधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे .   यासंदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त उपाययोजना त्याप्रमाणे - ज्या भागात मागील   हंगामात नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव   झालेला असेल त्यांनी त्वरित एकरी पाच फेरोमन सापळे लावून या किडीच्या पतंगावर नियमित   पाळत ठेवावी व दर आठवड्याने   फेरोमन सापळ्यामध्ये   अडकणारे पतंग नष्ट करावे जसजसे या पतंगाची संख्या वाढेल तसतसे फेरोमन सापळ्याची संख्या एकरी १५सापळे पर्यंत करावी म्हणजे   हे पतंग   मोठ्या   प्रमाणावर नष्ट करणे शक्य होईल व या किडीच्या पुढील पिढ्याची निर्मिती थांबवता येईल. एक मादी चार ते पाच दिवसात सर्वसाधारण   १५०० ते २००० पर्यंत अंडी देऊ शकते. जर   प्रत्येक   नर फेरोमन    सापळ्यात अडकला तर त्याची मादी सोबत   मिलन होणार   नाही परिणामी   किडीची   पुढील   प्रजोत्पादन   थांबून मोठ्या प्रमाणावर पिढ्यांची निर्मिती न होता

सौजन्यशील पिढी घडविण्यासाठी ‘मूल्यवर्धन’ उपयुक्त-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
  अकोला , दि . २७ ( जिमाका )- जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मू ल्यवर्धन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात   राबविण्यात येत आहे.   आज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून भावी समाजासाठी सौजन्यशील पिढी घडवायची असेल तर ‘मूल्यवर्धन’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी   जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व   शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यावतीने   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘मूल्यवर्धन’ जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस ,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ. सुभाष पवार , शिक्षणसभापती चंदशेखर पांडे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे , मुथ्था फाउंडेशनचे   शांतीलाल मुथ्था , डायटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे , शिक्षणाधिकारी   प्रकाश मुकूंद , प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग ,   मुथ्था   फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख सुभाष गादीया   यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,   गेल्या चार पाच वर्षापासुन   जिल्हा परिषदेच्या शाळेत मुल्यवर्

मराठी भाषा गौरव दिन भाषा असते संस्कृतीचा मानबिंदू- विजय दळवी

इमेज
अकोला, दि.२ ७ (जिमाका)-   मराठी भाषा ही आपली ओळख आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृती दिसत असते. त्यामुळे भाषा हे केवळ एक संवाद माध्यम नसून भाषा ही आपल्या संस्कृतीचा मानबिंदू होय, असे प्रतिपादन आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख तथा साहित्यिक   विजय दळवी यांनी केले.   जिल्हा माहिती कार्यालय अकोला व    सुधाकर राव नाईक कला , विज्ञान व उमाशंकर खेतान   वाणिज्य महाविद्यालय , अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने   कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आकाशवाणी केंद्र अकोलाचे कार्यक्रम विभाग प्रमुख विजय दळवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ग्रंथमित्र बी.पी. पवार हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत बोबडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,   मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. भास्कर पाटील, प्रा. एन. एफ.चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.

खरीप हंगामाकरीता स्थानिक पातळीवर सोयाबीन उपलद्धतेसाठी घ्यावयाची काळजी

        अकोला , दि . 26 ( जिमाका )-   अमरावती विभागातील सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र  14.51 लाख हेक्टर असुन या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढणा-या क्षेत्रसाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे.  राज्यामध्ये सन 2019 मध्ये  उशिरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढण्याच्या  कालावधीतील  अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  बीज उत्पादन क्षेत्रावर उत्पादन झालेले बियाणे व तसेच राज्यातील शेतक-यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्याची पेरणी  करून  उत्पादित केलेले बियाणे हे पुढील खरीप 2020  साठी व्यवस्थितपणे राखून ठेवणे/साठा करून ठेवणे गरजेचे आहे.             सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ   वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता   नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित   बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या   प्रतीच्या   बियाण्यांची चाळणी करून निवड   करावी.    सोयाबीन बियाण्याची बाह्यावरण कवच नाजूक व पातळ   असल्यान

कृषि विभागाचा लोगो सुधारीत लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा

             अकोला , दि . 26 ( जिमाका )- कृषि विभागाच्या लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकामाकरीता वापरण्यात येतो. सद्या कृषि क्षेत्रात  आधुनिक तंत्रज्ञान ,  माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात, त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करून नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. तरी लोगोमध्ये सुधारण करून डिटीपी , डिझाईन चे सॉफ्ट व हार्ड रंगीत  कॉपी कृषि माहिती विभाग, कृषि भवन, २ रा मजला, शिवाजीनगर पुणे येथे सक्षम व   ddinfor@gmail.com   या ई-मेलद्वारे दि. २५ मार्च पर्यंत पाठविण्यात यावा, उत्कृष्ठ लोगो तयार करणा-या व्यक्ती/ संस्था/फर्म यांना रु. 1,00,000/-(रू.एक लाख रक्कम) पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील याची नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी कृषि उपसंचालक माहिती, कृषि भवन ,कृषि आयुक्तालय पुणे येथे  तसेच  कार्यालयीन क्रमांक  020-25537865  किंवा मोनं 9823356835 या क्रमांकावर संपर्क साधावा.                                                                                    

मराठी भाषा गौरव दिन सुधाकरराव नाईक महाविद्यालयात आज (दि.27) कार्यक्रम

अकोला , दि.26(जिमाका)-   कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त   आज गुरुवार            दि. 27 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय अकोला व    सुधाकर नाईक कला , विज्ञान व उमाशंकर खेतान   वाणिज्य महाविद्यालय , अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   हा कार्यक्रम   सुधाकरराव नाईक   कला विज्ञान महाविद्यालय , तुकाराम चौक अकोला येथे गुरुवार दि.27 रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव बी.पी. पवार हे राहणार असून आकाशवाणी केंद्र अकोला चे कार्यक्रम विभागप्रमुख विजय दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्राचार्य डॉ. जयंत बोबडे ,   मराठी विभागप्रमुख डॉ. भास्कर पाटील , प्रा. एन. एफ . चव्हाण , जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन महाविद्यालयाच्या वाड.मय मंडळाचे अध्यक्ष गणेश लोणकर यांनी केले आहे.              00000

भारताची जनगणना -2021 जनगणनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
अकोला , दि . 26 ( जिमाका )- मतदाराच्या   परिसिमा,   लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि इतर स्थानिक संस्थाचे आरक्ष्‍ाण, प्रभावी सार्वजनिक प्रशासन यासाठी भारताची जनगणना-2021 साठी घरोघरी भेट देऊन माहिती संकलनाचे काम करण्यात येणार आहे.   जनगणनेची अत्यंत प्रभाविपणे   अंमलबजावणी   करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्ह्यातील व महानगर पालीकेतील सर्व    चार्ज अधिकारी , रेग्युलर असिस्टंट व टेकनीकल असिस्टंट यांचे   जनगणना 2021   साठीचे प्रशिक्षण अयोजीत करण्यात आले आहे. त्यावेळी मार्गदर्शन   करतांना ते बोलत   होते.   यावेळी   उपसंचालक जनगणना रघु अलुमोलू , वरिष्ठ निरिक्षक प्रविण भगत, वरिष्ठ पर्यवेक्षक, एस.एन. कुलकर्णी, पर्यवेक्षक आर .ए. पाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे़, जिल्हा सुचना अधिकारी अनिल चिचोंले यांची प्रमुख उपस्थिती होती. 00000

गुरूवार (दि.27) रोजी मुल्यवर्धन मेळावा

             अकोला , दि .25 ( जिमाका ) – जिल्हा परिषदेच्या   व महानगरपा लिकां च्या शाळा ं मध्ये शिक्षकांमध्ये   विद्यार्थ्यांमध्ये   होत असले ले परिवर्तन   सर्वसामान्य   जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी   गुरूवार ( दि .27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी   10 वाजता मुल्यवर्धन मेळावा व गौरक्षण संस्थानच्या मागील मैदा नावर सकाळी साडेनऊ वाजता प्रदर्शन आयो जित केले आहे , असे   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . एस . डी . डुकरे यांनी कळविले आहे .             महाराष्ट्र शासन   आणि   शांतीलाल मुथ्या फाउंडेशन यांच्या सं युक्त विद्यमाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या   व   मनपाच्या   सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते   पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी   मुल्यवर्धन हा कार्यक्रम जानेवारी 2016 पासुन टप्याटप्याने राबविण्यात आला . या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात   आले आहे .