ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
अकोला,दि. 19 (जिमाका)- कोविड-19 चा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असून पोलिस, महसूल व आरोग्य विभागाने समन्वय साधून ग्रामीण भागातील कोरोना ससंर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी
यांच्या दालनात ग्रामीण भागात वाढता कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी
मोनीका राऊत, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपाडे, अभयसिंह मोहीते, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले की, ज्या गावात कोरोना रुग्ण जास्त आहे अशा भागात निर्बंध अधिक कडक करुन गाव बंदिस्त करावे. तसेच गावातील बांधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे चाचण्या कराव्यात. कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन न करण्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील व्यक्तिंनी अंगावर दुखणे न काढता व कोरोना लक्षण दिसताच चाचणी करुन घ्यावी. याकरीता ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, सरपंच, शिक्षक याच्या मदतीने पथक तयार करुन ग्रामिण भागातील कोरोना रुग्णाचा, संपर्कातील व्यक्तीचा तसेच कोरोना रुग्ण योग्य ते उपचार घेत आहे याची खातरजमा करावे, असेही निर्देश दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा