महिला व अनाथ बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा - ना.ऍड.यशोमती ठाकूर
अकोला, दि.3(जिमाका)-
महिला व अनाथ
बालकांकरीता असलेल्या योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री
ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. ना.ऍड ठाकूर यांनी आज अकोला येथे महिला व बाल
विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात ही आढावा बैठक घेण्यात आली. आमदार नितीन देशमुख,
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस
अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे,
महिला बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे, उपविभागीय
अधिकारी डॉ. निलेश अपार, समाज सेविका आशा मिरगे आदि उपस्थित
होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा