रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १५४५ चाचण्यात १६७ पॉझिटीव्ह

 अकोला,दि.२० (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१९) दिवसभरात झालेल्या १५४५ चाचण्या झाल्या त्यात १६७  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला येथे ८६चाचण्या झाल्या त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोट येथे ८५ चाचण्या झाल्या त्यात १७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बाळापूर येथे ३५ चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, पातूर येथे ५५ चाचण्या झाल्या त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे १०९ चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे १६४ चाचण्या झाल्या त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शी टाकळी येथे ३५ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला महानगरपालिका येथे ७६९ चाचण्या झाल्या त्यात ३२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २४ चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५९ चाचण्या झाल्या त्यात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे ११६ चाचण्या झाल्या त्यात ३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे १५४५ जणांच्या चाचण्या होऊन त्यात १६७  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात  लक्ष ३८ हजार ७०९ चाचण्या झाल्या पैकी १२६४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :