पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन

  जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन अकोला, दि. ३१ :  जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे व उपचार होत आहेत. नागरिकांनी  मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे दोन पुरूष व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे वय २८ व ४२ वर्षे आहे. जिल्ह्यातील एक  ३८ वर्षीय महिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात दुर्गवाडा येथे कोविडबाधित आढळल्याने तिथेच गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. यापूर्वी अकोला महापालिका क्षेत्रात कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या रुग्णास सौम्य लक्षणे होती. त्यामुळे गृह विलगीकरणात उपचार करण्यात आले. हा रुग्ण जेएन-1 पॉझिटिव्ह असल्याची माहिती दि. २४ डिसेंबर रोजी प्राप्त झाली. सद्य:स्थितीत हा रुग्ण बरा असून त्यास कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉ. गाढवे यांनी सांगितले. सर्व आरोग्य संस्थांमध्ये श्वसन आजार व तत्सम लक्षणे आढळल्यास स्वॅब घेऊन प

राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
 राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोला, दि. २९ : अकोला जिल्ह्यातून बॉक्सिंग प्रकारात चांगले खेळाडू पुढे येत आहेत, याचा आनंद आहे. जिल्ह्याचा क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. बॉक्सिंग क्षेत्रातील खेळाडूंसाठी स्वतंत्र रिंगण विकसित करण्यात येईल, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले. वसंत देसाई स्टेडियम येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग व शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीसवितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास गतिमान केला. जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंसाठीही अनेक उपक्रम राबविण्यात येतील. मुष्टियुद्ध खेळाडूंसाठी बंदिस्त मैदा

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
  अकोला, दि. २९ : अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाचा शेतकरी समृद्ध होण्यासाठी कसा उपयोग होईल, यादृष्टीने कृषी विद्यापीठाने चारभिंतीच्या पलीकडे जाऊन काम करावे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरावी, असे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करावे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोत्सव- ‘अॅग्रोटेक प्रदर्शन २०२३’ चा  समारोप पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, 'महाबीज'चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक

पालकमंत्र्यांकडून विविध कामांचा आढावा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी 'स्पेशल ड्राईव्ह' घ्यावा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
  अकोला, दि. २९ : नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० हजार मिळण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी 'स्पेशल ड्राईव्ह' घ्यावा. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टी अनुदान वितरण कार्यवाही व पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी घेतला. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे. पंचनामा प्रकियेत सहकार्य न करणाऱ्या, तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळण्यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह घेऊन कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ

इमेज
  अकोला, दि. २९ : जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ  महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज झाला. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकासकामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉररूम स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. पालकमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, अव्वल कारकून व इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. ०००

कृषी विभाग,आत्मा व डॉ.पं. दे. कृषी विद्यापीठाच्या विद्यमाने अकोला येथे कृषी महोत्सव

इमेज

मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी २२ जानेवारीला

  मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी २२ जानेवारीला अकोला, दि. २८ : छायाचित्र मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमातील सुधारणेनुसार, मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी दि. २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. पूर्वनियोजनानुसार ही प्रसिद्धी दि. ५ जानेवारीला करण्यात येणार होती. तथापि, या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दि. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत, महसूल उपजिल्हाधिकारी कार्यालयात, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार केंद्रांवर याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. मतदारांनी यादीचे अवलोकन करून आपले नाव असल्याची खातरजमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. ०००

जिल्हा लोकशाहीदिन १जानेवारीला

  जिल्हा  लोकशाहीदिन १जानेवारीला   अकोला, दि. २८ : जिल्हा लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि. १ जानेवारी रोजी दु. ३ वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोडल अधिका-यांनी अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. ०००

पुढच्या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

  पुढच्या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर  अकोला, दि. २८ : जिल्ह्यात २०२४ या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून, तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काढला आहे. त्यानुसार अक्षयतृतीयेनिमित्त दि. १० मे (शुक्रवार) रोजी, रक्षाबंधन- नारळी पौर्णिमेनिमित्त   दि. १९ ऑगस्ट (सोमवार) रोजी, ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त दि. ११ सप्टेंबर (बुधवार) रोजी संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच अधिकोष यांना लागू होणार नाही. ०००   

नायलॉनचा मांजा न वापरण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

  नायलॉनचा मांजा न वापरण्याबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन अकोला, दि. २८ : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला बाधा पोहोचू नये याची काळजी घेणे महत्वाचे आहे.   पर्यावरण व पशूपक्ष्यांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे इजा व दुखापती टाळण्याच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर जिल्ह्यात कुठेही होता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.   पर्यावरण संरक्षण कायद्याने नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसे प्रतिबंधात्मक आदेशही निर्गमित करण्यात येतात. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाहीही होते. तथापि, सुजाण नागरिक म्हणून नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा २० जानेवारीला

  नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा २०  जानेवारीला अकोला, दि. २८ :   पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दि. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात २५ केंद्रांवर होणार असून, एकूण ७ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थ्यांनी   https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard   या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर युजरनेम म्हणून वापरावा. स्वत:ची जन्मतारीख हा पासवर्ड आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी द्विप्रतीत स्वाक्षांकित करून घ्यावे. त्यातील एक प्रत परीक्षा पर्यवेक्षकाला द्यावी लागणार आहे, असे कळविण्यात आले आहे. ०००

महिला तक्रार समितीच्या सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले

  महिला तक्रार समितीच्या सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले  अकोला, दि. २८ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा स्थानिक तक्रार समिती स्थापण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष व तीन सदस्य निवडीसाठी इच्छूकांकडून दोन प्रतीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.   अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण किंवा विशिष्ट ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारनिवारणासंबंधी काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव असावा. या क्षेत्रात कार्य करणारी महिला, तसेच त्यांना श्रम रोजगार सेवा व फौजदारी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सदस्यपदासाठी महिलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था, संघटनेत कार्यरत असणे आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.   एका पदासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील महिलांतून निवड केली जाणार आहे.   प्रस्तावासह सामाजिक कार्याचा तपशील, वृत्तपत्रीय कात्रणे, कुठलाही गुन्हा नोंद नसल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाचे चारित्र्य प्रमाणपत्र, जिल्हा दंडाधिका-यांचे विना

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

  अकोला दि. 22- जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रांस   येथे होणार असून आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्‍य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition   आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा , विभाग , राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. National Development Corporation   (NSDC)   मार्फत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन जानेवारी 2024 मध्ये संबंधित जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्याची शक्यता आहे सदर स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी   व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलंपिक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे ना

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे प्रयत्नातुन सेवानिवृत्त कर्मचा-यास मिळणार सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान रक्कम

अकोला , दि. 22 :     जिल्हा   विधी सेवा   प्राधिकरण   , अकोला   हे   मा. प्रमुख   जिल्हा व सत्र   न्यायाधिश   मार्गदर्शनानुसार कार्यरत आहे.     अर्जदार   भास्कर   उकर्डा   उगले , यांनी दि. 13 सप्टेंबर 2023   रोजी त्यांचे   विधीज्ञ   गजानन   भोपळे   यांचे   मार्फत     जिल्हा   विधी सेवा   प्राधिकरण   , अकोला       यांचेकडे   अर्ज देवून विनंती   केली की , त्यांची   शासकीय   कार्यालयांनी   रोखलेली उपदान रक्कम   व सेवानिवृत्तीची वेतनाची रक्कमे   संबंधीची वाद   मिटविण्यासाठी सहकार्य   करावे.   अर्जदार   हा लघुपाटबंधारे उपविभाग पातुर येथे कार्यरत होते.   व दिनांक 31 ऑक्टोबर 2016   रोजी सेवानिवृतत   झाले.   अर्जदार याने   चार   विविध   पतसंस्थाकडुन   खुप   वर्षाआधी   कर्ज घेतले   होते. त्याची परतफेड न झाल्यामुळे   अर्जदाराचे सेवानिवृत्ती वेतन   तसेच   उपदान   रक्कम   मागील   7 वर्षापासुन रोखून ठेवण्यात आली होती. ‍ि‍िजिल्हा   विधी सेवा   प्राधिकरण   , अकोला     यांनी सर्व संबंधीतांना नोटीस काढून कार्यालयात बोलाविले. त्या चार विविध   पतसंस्था   यांनी चर्चेअंती नियमाप्रमाणे कर्ज आणि