पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 136 चाचण्या,13 पॉझिटिव्ह

  अकोला , दि. 31 (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 136   चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आला ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण , पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोट येथे 37 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,   बार्शीटाकळी येथे दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवा ल पॉझिटीव्ह आ ला नाही , तेल्हारा येथे एक चाचणी झाली त्यात   कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.   तर अकोला मनपा येथे 54 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला , तर 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझ

326 अहवाल प्राप्त; 65 पॉझिटीव्ह, 61 डिस्चार्ज, एक मयत

अकोला , दि. 31 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 326 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 261   अहवाल निगेटीव्ह तर 65 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्याच प्रमाणे काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ तर खाजगी लॅब मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4024 (3221 +725 + 78)  झाली आहे. आज दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 27840 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27124, फेरतपासणीचे 178 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 538 नमुने होते. आजपर्यंत एकूण 27643 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 24422 तर पॉझिटीव्ह अहवाल   4024 (3221 +725 + 78) आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज 65 पॉझिटिव्ह दरम्यान आज दिव

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी विसर्जन करावे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

इमेज
अकोला , दि. 31 (जिमाका)-   कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशउत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावयाचा असून गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. तसेच नागरिकांनी शक्यतोवर घरच्याघरीच मुर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. गणेश विसर्जन आयोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे शहर अभियंता अजय गुजर, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांची उपस्थिती होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश घाटावर मुर्ती विसर्जनासाठी आणतांना घरीच पुजा करावी. तसेच मातीच्या मुर्ती असल्यास त्याचे घरच्या घरीच विसर्जन करावे. लहान मुले व वृध्दांनी गणेश विसर्जनासाठी येवू नये. गणेश मुर्ती सोबत एक किवा दोघांनी यावे. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जनाला जातांना घराजवळच्या गणेश घाटावर किंवा सर्वात जवळच्या मार्गानी विसर्जनाला जावे. कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये,

सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
  अकोला , दि. 31 (जिमाका)-   जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी   सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार (दि.7) पासून होणार असून हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली   यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, मनपा आयुक्त संजय कापडणीस, डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. उमेश कवळकर, डॉ. नेताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला ?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव   प्रतिकार शक्ती तयार झाली ? त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही ? यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे . असे सर्वेक्षण   

नदी काठच्या गावातील नागरिकांना दक्षतेचा इशारा

  अकोला , दि. 31 (जिमाका)-   हवामान विभाग ,   नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार    ( दि. 4 सप्टेंबर )   पर्यंतच्या कालावधीत     जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे .   जिल्हयामध्ये एक मोठा, तीन मध्यम व इत्तर लघु प्रकल्पामध्ये जवळपास 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतरही   प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.    तरी याबाबत नदीपात्रा जवळील    गावांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेवून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व   संबधित अधिकारी /   कर्मचारी / मंडळ अधिकारी / तलाठी /   ग्रामसेवक कृषी सहायक ,   आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील   नागरिकांनी नदी नाल्यांना पूर पाहण्यास जावू नये . तसेच पुल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये करीता त्याअनुषंगाने   योग्य ती दक्षता घ्यावी ,   असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १३४ चाचण्या, नऊ पॉझिटिव्ह

अकोला,दि.३० (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १३४ चाचण्या झाल्या त्यात  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.             आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर बार्शीटाकळी येथे दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोला मनपा येथे ९६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर ३१ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात १३४ चाचण्यांमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत १२५७१ चाचण्या झाल्या त्यात ७३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

२५३ अहवाल प्राप्त; ६५ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज

अकोला,दि.३०(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८८ अहवाल निगेटीव्ह तर  ६५ अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्याच प्रमाणे काल (दि.२९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २८ तर खाजगी लॅब मध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३९४२ (३१५६+७१६+७०)  झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २७४९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६७८५, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५३१ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७३१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४१६१ तर पॉझिटीव्ह अहवाल  ३९४२ (३१५६+७१६+७०) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज ६५ पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभरात ६५ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १६६ चाचण्या, २८ पॉझिटिव्ह

अकोला,दि.२९ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १६६ चाचण्या झाल्या त्यात  २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.             आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे ४२ चाचण्या झाल्या त्यात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोट येथे १६ चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे सात जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जण पॉझिटीव्ह आले. पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोला मनपा येथे ५८ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ३२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे दिवसभरात १६६ चाचण्यांमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.तर आजपर्यंत १२४३७ चाचण्या झाल्या त्यात ७२१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा

३३१ अहवाल प्राप्त; २९ पॉझिटीव्ह, २६ डिस्चार्ज, तीन मयत

अकोला,दि.२९(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३०२ अहवाल निगेटीव्ह तर  २९ अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्याच प्रमाणे काल (दि.२८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १०  तर खाजगी लॅब मध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३८३६ (३०९१+६८८+५७)  झाली आहे. आज दिवसभरात २६ रुग्ण बरे झाले, तर तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २७२३४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६५३१, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५२७  नमुने होते. आजपर्यंत एकूण २७०६४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३९७३ तर पॉझिटीव्ह अहवाल ३८३६ (३०९१+६८८+५७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज २९ पॉझिटिव्ह दरम्यान आज दिवसभर

कृषि मंत्री ना. भुसे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीचे छायाचित्रे

इमेज
 

‘पोकरा’योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्या- कृषिमंत्री दादाजी भुसे

इमेज
  अकोला , दि.२९(जिमाका)-  स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, या संदर्भातील सर्व  प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून अकोला जिल्ह्याची कामगिरी  सुधारावी,असे निर्देश राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज येथील आढावा बैठकीत दिले. अकोला जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा आज ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, कृषि संचालक नारायण सिसोदे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, उपसंचालक अरुण वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा सादर करण्यात आला. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पिक कर्ज योजना, पिक विमा योज

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १९८ चाचण्या, १० पॉझिटिव्ह

  अकोला , दि.२८   (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या   १९८ चाचण्या झाल्या त्यात   १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आला ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोला ग्रामिण येथे २४ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोट येथे ५५ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे १३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. मुर्तिजापूर येथे एक चाचणी झाली त्यात कुणी पॉझिटीव्ह आले नाही. अकोला मनपा येथे ४८ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे १२ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ४२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे दिवसभरात १९८ चाचण्यांमध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.तर आजपर्यंत १२२७१ चाचण्या झाल्या त्यात ६९३ जणांचे अह

२५० अहवाल प्राप्त; ४७ पॉझिटीव्ह, २८ डिस्चार्ज, एक मयत

  अकोला , दि.२८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २०३ अहवाल निगेटीव्ह तर  ४७ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्याच प्रमाणे काल (दि.२७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये ३१ तर खाजगी लॅब मध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे   आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३७६५ ( ३०६२ + ६ ७८+२५ )  झाली आहे. आज दिवसभरात २८ रुग्ण बरे झाले , तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण २६८९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६१९७ , फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५१९  नमुने होते. आजपर्यंत एकूण २६७३३  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३६७१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल  ३७६५ ( ३०६२ + ६ ७८+२५ )  आहेत , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील मंजूर शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी आधार क्रमांक व बॅंक खाते संलग्नता आवश्यक

  अकोला , दि.२८   (जिमाका)- महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होण्यासाठी  बॅंक खाते व आधार क्रमांक संलग्नता आवश्यक आहे. यासंदर्भात  जी प्रकरणे  प्रलंबित आहेत  त्याप्रकरणी विद्यार्थ्यांचे आधार क्र्मांक व बँक खाते  त्यांच्यास्तरावरून जसे जसे अद्यावत केले जाईल, त्याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास कळविले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,अकोला यांनी दिली आहे. महाडीबीटी पोर्टलवरून सन २०१९-२० मध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या मंजूर झालेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे पहिला/दुसरा हप्ता किंवा दोन्ही हप्त्याचे अर्ज मंजूर होऊन देखील देय होणारी शिष्यवृत्ती रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थी /महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे विविध , पालक तसेच विविध संघटनांनी   आयुक्तालयाचे व शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. त्याअनुषंगाने वरील बा्ब

खते खरेदीसाठी वापरा डिजीटल पेमेंट पद्धती -जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

  अकोला , दि.२८(जिमाका)- खतांचे विक्री व्यवहार सुरळीतपणे व्हावेत यासाठी  जिल्ह्यातील खत विक्रेते  तसेच शेतकरी बांधवांनी खते खरेदी विक्री करतांना डिजीटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,   पिकांसाठी खतांची खरेदी करतांना शेतकऱ्यांकडून कॅशलेस/ डीजीटल पेमेंट प्रणालीचा अवलंब करण्यात यावा असे निर्देश केंद्रीय रसायन व खते मंत्रालय तसेच कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत.   खत विक्री संदर्भातथेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडून   पॉस ( POS) द्वारे अनुदानित खताची विक्री करणे सोईचे झाले आहे.   त्यामुळे खतांचा पुरवठा हंगामानुसार सुनियोजित   पद्धतीने करण्यात येत आहे.   खतांची विक्री व्यवहार सुरळीतपणे सुरु रहावी यासाठी   राज्यातील सर्व खत विक्रेत्यांकडे खते विक्रीसाठी कॅशलेस/ डिजीटल पेमेंट प्रणाली लागू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.   त्यानुसार जिल्ह्यातील खत विक्रेते

कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

अकोला , दि.२८(जिमाका)-  राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे शनिवार दि.२९ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-   शनिवार दि.२९ रोजी सकाळी साडेअकरा वा. कृषि विषयक जिल्हा आढावा बैठक, स्थळः नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. बैठकीनंतर क्षेत्रिय भेटी व बुलडाण्याकडे प्रयाण.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात २०१ चाचण्या,३१ पॉझिटिव्ह

  अकोला , दि.२७   (जिमाका)-   कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या   २०१ चाचण्या झाल्या त्यात   ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह   आला ,   अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.              आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-   अकोट , बार्शीटाकळी , पातूर येथे चाचण्या झाला नाही तर अकोला ग्रामिण येथे २६ चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापुर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेल्हारा येथे ५० चाचण्या झाल्यात त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे ४१ चाचण्या झाल्या त्यात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच अकोला मनपा क्षेत्रात ४८ चाचण्या झाल्या त्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या १८ चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा दिवसभरात २०१ चाचण्या होऊन ३१ जणांचे अहवा

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम: ‘शाळा आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे खेडोपाडी ज्ञानदान

इमेज
  अकोला , दि.२७   (जिमाका)-   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरीब तसेच दुर्गम भागात मोबाईल वा नेटवर्क सुविधा उपलब्ध नसणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात प्रकल्प अधिकारी अकोला राजेंद्रकुमार हिवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन जि ल्ह्यां चे कार्यक्षेत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत असून शासकिय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मधून शिक्षण घेणा ऱ्या वि द्या र्थ्यांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी पुरेसे साधन नसल्याने अनलॉक लर्निंग उपक्रमातंर्गत ‘ शाळा आपल्या दारी ’ हा उपक्रम हाती घेतला आहे.                                  अकोला प्रकल्पात   शास की य आश्रमशाळा कोथळी, पणज, तरोडा, घाटबोरी, सायखेड, शेलूबाजार किन्हीराजा, मुसळवाडी या ठिकाणी शास की य आश्रमशाळा आहेत. या शाळामधून २३४३ वि द्या र्थी शिक्षण घेतात. त्याचबरोब