पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नविन शिधापत्रिका उपलद्ध

                  अकोला , दि . 31 ( जिमाका )-  अकोला शहरातील नविन शिधापत्रिका मिळणे करीता देण्यात आलेल्या सर्व अर्जदार   यांना आवाहन करण्यात येते की,  ज्या अर्जदारांनी नविन शिधापत्रिका  मिळण्याकरीता अर्ज सादर केलेले आहेत.  अश्या संबंधीत  अर्जदार  यांनी अन्नधान्य वितरण  अधिकारी  यांचे  कार्यालयामध्ये येवुन आपली  नविन शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी.                   तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका फाटलेली / खराब झालेली आहे. अश्या   शिधापत्रिकाधारकांनी जुनी शिधापत्रिका   आवश्यक कागदपत्रासह कार्यालयामध्ये   जमा करून “ दुयय्म शिधापत्रिका ” तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. तरी नागरीकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला शहराचे    अन्नधान्य वितरण अधिकारी   प्रतिक्षा   तेजनकर   यांनी   केले आहे. 00000

मुर्तिजापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित

         अकोला , दि . 31 ( जिमाका )- मा. राज्य निवडणूक आयोगानी मुर्तिजापुर तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षधाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. या अंतर्गत  विशेष ग्रामसभा आयोजीत करून प्रारूप प्रभाग  रचनेवर आरक्षणाची सोडत (अनुसूचित जमाती व नागरिकांचा  मागास प्रवर्गातील महिलांसह)  काढणे करीता  अध्यासी अधिकारी नेमुन विशेष  ग्रामसभेचा कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.             पारद,लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, टिपटाळा,   हिरपुर,   कवठा, (खोलापुर)   सोनोरी (बपोरी) कुरूम , माटोडा, धामोरी बु. राजुरा घाटे, धानोरा (पाटेकर)    या ग्रामपंचायतीचा   1   फेब्रूवारी   रोजी, भटोरी, गोरगांव, सांगवी , बपोरी , कवठा (सोपीनाथ)   कार्ली, खांदला, निंभा, विराहीत , मोहखेड, अनभोरा, जामठी बु. हातगाव, चिखली, या ग्रामपंचायतीचा   3 फेब्रूवारी रोजी , मंगरूळ कांबे, कंझरा या   ग्रामपंचायतीच्या   4 फेब्रूवारी रोजी संबंधीत   ग्रामपंचायतीच्या   कार्यालयात सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभेचे   आयेाजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये राज्य निवडणुक   आयोगाच्या   निर्देशाप्रमाणे   ग्रामपंचायतीचे सर्व   सदस्य आरक्ष

जि.प. ,पं.स सार्वत्रिक निवडणूक निवडणूक खर्चाचा अंतिम हिशोब शुक्रवार दि. 7 रोजी सादर करणे बंधनकारक

        अकोला , दि . 31 ( जिमाका )- अकोला जिल्हा परिषद  व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 ची निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा अंतिम हिशोब शुक्रवार  दि. 7 फेब्रूवारी आपल्या  विभागातील उपविभागीय अधिकारी यांचे कडे  जमा करून अपात्रतेची कार्यवाही टाळावी असे आवाहन  उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी  जि.प.पं.स निवडणूक विभाग अकोला यांनी केले आहे.             उमेदवारांचा निवडणूक खर्च स्विकारण्याकरिता   तेल्हारा व अकोट   तालुका करीता   उपविभागीय अधिकारी अकोट, बाळापुर व पातुर तालुका करीता   उपविभागीय अधिकारी बाळापुर, मुर्तिजापुर व बार्शिटाकळी तालुका करीता उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर व अकोला तालुका करीता   उपविभागीय अधिकारी   अकोला   यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.              जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वित्रिक निवडणुकीचा कार्यक्रम   दिनांक   19   नोव्हेंबर   2019   रोजी   मा. राज्य   निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला होता. निवडणूक   कार्यक्रमानुसार दि.   7 जानेवारी 2020 रोजी मतदान   व दि. 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी पुर्ण   करण्यात आली आहे.              

31 मार्च पुर्वी शंभर टक्के महसुल वसुली करा -विभागीय आयुक्त पियुषसिंह यांचे निर्देश

इमेज
        अकोला , दि . 31 ( जिमाका )- शासकीय कर ,उपकर , थकबाकी , मनपा, भुखंडे विक्री, जमीन मोजणी , अवैध अकृषक, महसुली  दंड,   सिलींग जमिन व इतर संकीर्ण महसुल वसुलीचे उदिष्ट 31 मार्च पुर्वी  शंभर टक्के  पुर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी महसुल अधिका-यांना दिलेत. जिल्हाधिकारी   यांच्या दालनात विभागीय आयुक्त पियुषसिंह यांच्या उपस्थितीत महसुल   वसुलीचा आढावा   व नियोजन बाबत बैठकीचे आयोजन   करण्यात आले होते.   यावेळी जिल्हाधिकारी    जितेंद्र पापळकर , अतिरिक्त   जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी निलेश अपार,   रामदास सिद्धभट्टी, रमेश पवार,   जिल्हा खनिकर्म   अधिकारी अतुल दोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे तसेच तहसिलदार व संबंधीत विभागाचे   अधिकारी उपस्थित होते. यावेळी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिव थाळी योजना, अवकाळी पावसामुळे नुकसान अनुदान   वाटप , पांदण रस्ते, सात-बारा   संगणीकीकरण तसेच मतदार नोंदणी नियोजन याबाबत आढावा   पियुषसिंह यांनी घेतला.  

पातुर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित

         अकोला , दि . 30 ( जिमाका )- मा. राज्य निवडणूक आयोगानी पातूर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षधाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. या अंतर्गत  विशेष ग्रामसभा आयोजीत करून प्रारूप प्रभाग  रचनेवर आरक्षणाची सोडत (अनुसूचित जमाती व नागरिकांचा  मागास प्रवर्गातील महिलांसह)  काढणे करीता  अध्यासी अधिकारी नेमुन विशेष  ग्रामसभेचा कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.             आलेगांव, शिर्ला, पास्टुल, बेलुरा खु,   चान्नी, चरणगांव, खानापुर,   राहेर, या ग्रामपंचायतीचा   1   फेब्रूवारी   रोजी, मलकापुर   , मळसूर, उमरा, बेलुरा बु, दिग्रस बु,   चांगेफळ, चतारी ,सस्ती   या ग्रामपंचायतीचा   3 फेब्रूवारी रोजी , देऊळगांव , तांदळी बु,   दिग्रस खु,   भंडाराज खु,   विवरा ,सायवणी, पिंपळखुठा   या   ग्रामपंचायतीच्या   4 फेब्रूवारी रोजी संबंधीत   ग्रामपंचायतीच्या   कार्यालयात सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभेचे   आयेाजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये राज्य निवडणुक   आयोगाच्या   निर्देशाप्रमाणे   ग्रामपंचायतीचे सर्व   सदस्य आरक्षण   निश्चित करण्यात येणार आहे.               संबंधीत ग्रामविकास अधिक

महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना शेतक-यांना बॅंक खाते आधार क्रमांकाशी जुळवून घेण्‍यासाठी सीएससी सेंटरवर संपर्क साधण्याचे आवाहन

                   अकोला , दि . 30 ( जिमाका )- महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत ज्‍या           शेतक-यांकडे दिनांक 1 एप्रिल , 2015 ते दिनांक 31 मार्च , 2019 पर्यंत उचल केलेल्‍या एक किवा एकापेक्षा जास्‍त ज्‍या कर्ज खात्‍यात अल्‍पमुदत पीक कर्जाची दि 30 सप्‍टेंबर , 2019 रोजी मुद्दल व व्‍याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्‍कम रु 2.00 लाखापर्यंत आहे , अश्‍या शेतक-यांचे अल्‍प / अत्‍यल्‍प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता , त्‍यांच्‍या कर्जखात्‍यात रु 2.00 लक्ष कर्जमुक्‍तीचा लाभ देण्यात येत आहे.            अकोला जिल्‍हयात महात्‍मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येत असुन सदर योजनेअंतर्गत जिल्‍हयातील राष्‍ट्रीयकृत , ग्रामीण , व्‍यापारी व जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक यांच्‍या अहवालानुसार 1 , 13 , 849 शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र आहेत. त्‍यापैकी 1 , 12 , 680 शेतक-यांचे कर्जखाते आधार क्रमांकाशी लिंक करण्‍यात आलेले आहेत. 1064 शेतक-यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी जुळवून घेंण्‍याची प्रक्रिया प्रगतीपथावर

केंद्र शासनाच्या स्टँन्डअप इंडिया योजना धनगर समाजातील महिलांकरीता 15 टक्के मार्जीन मनीसाठी अर्ज आमंत्रीत

                 अकोला , दि . 30 ( जिमाका )- केंद्र शासनाच्या  स्टॅंन्डअप इंडिया योजनेअंतर्गत  महाराष्ट्र राज्यातील  धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांची   मर्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे  या नवउद्योजक  महिला लाभार्थ्यांना   एकुण प्रकल्प किमतीच्या   लाभार्थी यांच्या हिस्श्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मर्जीन मनी उपलब्ध करण्यात येणार आहे.                 या योजने अंतर्गत   महाराष्ट राज्यातील धनगर   समाजातील महिलांकारीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक   महिला   यांनी   10 टक्के स्वहीस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅंन्डअप इंडिया योजनेअंतर्गत   75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर   उर्वरीत   Front End Subsidy 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.   सदर योजनेचा लाभ स्टॅंन्डअप इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येईल,   त्यासाठी संबंधीत महिला लाभार्थी यांनी   जिल्हाधिकारी यांच्या   अध्यक्षतेखालील   समितीकडे   केलेल्या विवरणपत्रात अर्ज सादर करणे   आवश्यक आहे,   अर्जासोबत उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रम

जिल्हा आढावा बैठक सेवा हमी कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

इमेज
अकोला , दि . 30 ( जिमाका )- सेवा हक्क अधिनीयम या कायद्यातंर्गत विविध शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येतो. या कायद्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध सेवांचा अंतर्भाव असतो यासाठी या कायद्यातंर्गत विहित अवधी दिलेला आहे. दिलेल्या अवधीत सेवांचा   लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा यासाठी सेवा हक्क अधिनीयम कायद्याचे काटेकोटपणे   व तंतोतंतपणे पालन व्हावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे , नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, अधिक्षक श्रीमती पागोरेसह   सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.             महाराष्ट्र   लोकसेवा हक्क अधिनीयम 2015 अंतर्गत शासकीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांचा फलक कार्यालयात   दर्शनी   भागात लावण्यात यावा असे सांगुन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, या फलकावर   शासकीय कार्यालयातील   सेवांचा तपशील , शुल्क , अर्जाचा नमुना, काल

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश

अकोला दि . 29 ( जिमाका ) - प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला , वाशिम व बुलढाणा जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना   शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्याकरीता   प्र वे श अर्ज प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांचे कार्यालयात विनामुल्य मिळतील.प्रवेश अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. प्रवेश अर्ज परिपुर्ण भरून सादर करण्याची अंतीम तारीख   शनिवार दि. 15 फेब्रूवारी   आहे . इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री   मधे प्रवेश घेण्यासाठी अटी व शर्ती या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा , पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी,जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा,या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख च्या आत असणे आवश्यक आह े . इयत्