संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी बाल रोग तज्ञ डॉक्टरांनी सज्ज रहा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



अकोला,दि.25(जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना ससंर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये होणारा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील बाल रोग तज्ञ डॉक्टरांनी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हा नियोजन भवनात बाल रोग तज्ञ टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, उपधिष्ठाता कुसूमाकर गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. सिरसाम, उपअधिक्षक डॉ. घोरपडे, आदी उपस्थित होते.

बाल रोग तज्ञ टास्क फोर्सच्या बैठकीत निर्देश देण्यात आले की, जिल्हा व तालुकास्तरावर बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करुन त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध कराव्या.  बाधीत असलेल्या  बालकांच्या पालकांना उपचाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करावे. तसेच अशिक्षीत पालकासाठी आशावर्कस् व अंगणवाडी सेवीकेव्दारे बाधीत बालकांचे निरीक्षण करावे. याकरीता त्यांना प्रशिक्षण द्यावे.  अतिजोखमीच्या बालकांसाठी व्हेटीलेटर व ऑक्सीजन बेड सज्ज ठेवावे. याकरीता आवश्यक साधनसामुग्री व औषधी उपलब्धतेबाबत नियोजन करावे. कोविड संदर्भात देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासकीय तसेच  खाजगी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. शहरातील तसेच जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी आपल्याकडे येणाऱ्या बालकांमध्ये कोविड लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी व नियमानुसार उपचार पद्धती राबवावी, शक्यतो बालकांना लागलीच शासकीय रुग्णालयात संदर्भित करावे, असे आवाहन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :