पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

 

अकोला,दि. 16 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि. 17 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि. 17 रोजी सकाळी  10. वा. 30 मि. शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वा. पातुर जि. अकोलाकडे प्रयाण व सकाळी 11 वा. 40 मि. नी पातुर येथे आगमन. सकाळी 11 वा. 45 मि. नी कोविड केअर सेंटर(ऑक्सीजन सुविधायुक्त) पातुर येथे थेट व कोविड-19 लसीकरणबाबत संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा.  दुपारी 12 वा.30 मि. नी  श्री. अजय ढोणे शिवसेना शहरप्रमुख पातुर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव, दुपारी 1 वा. बाळापूर जि.अकोलाकडे प्रयाण व दुपारी 1 वा. 40 मि. बाळापूर येथे आगमन. दुपारी 1 वा. 45 मि. नी कोविड केअर सेंटर व ऑक्सीजन प्लांट बाळापूर येथे भेट. तसेच कोविड-19 लसीकरणबाबत संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा. 

दुपारी 2 वा.15 मि. निंबा फाटामार्गे तेल्हारा जि.अकोलाकडे प्रयाण, दुपारी 3 वा.25 मि. नी तेल्हारा जि.अकोला येथे आगमन. दुपारी 3 वा.30 मि.नी कोविड केअर सेंटर व ऑक्सीजन प्लांट तेल्हारा येथे भेट व कोविड-19 लसीकरणबाबत संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा. दुपारी 4 वाजता हिवरखेड मार्गे अकोट जि.अकोलाकडे प्रयाण व दुपारी 4 वा. 45 मि. नी अकोट येथे आगमन. दुपारी 4 वा. 50 मि.नी कोविड केअर सेंटर व ऑक्सीजन प्लांट अकोट येथे भेट व कोविड-19 लसीकरणबाबत संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा. सायंकाळी 5 वा. 30 मि.नी अकोलाकडे प्रयाण व सायंकाळी 6 वा. 30 मि. नी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. सवडीने कुरळपुर्णा मार्गे ता. अचलपुर जि.अमरावतीकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ