कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 अकोला,दि. (जिमाका)- अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर  दि.१५ मे ते दि. १ जून या कालावधीसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र खरीप हंगाम जवळ आलेला असतांना कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करता याव्या यासाठी कृषी सेवा केंद्रांना  सकाळी सात ते दुपारी तीन अशी वेळ वाढवून देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  काल (दि.२०) निर्गमित केले आहेत.

या आधीच्या आदेशात ही वेळ सकाळी सात ते दुपारी दोन अशी होती. मात्र सद्यस्थितीमध्‍ये खरीप हंगाम सुरु असल्‍याने तसेच शेतीचे कामे सुरु असल्‍यामुळे कृषी निविष्‍ठा  व त्‍या  संबंधीत कृषि सेवा केन्‍द्र, कृषी अवजारे, कृषी साहीत्‍य बि-बियाणे विक्री सेवा केन्‍द्रे यांच्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तथापि,जिल्‍हयातील कोविड रुग्‍णसंख्‍येची वाढ लक्षात घेता बांधावर निविष्‍टा  वाटप, ई-कॉमर्स (ऑनलाईन विक्री) , घरपोच सेवा इ. पद्धतीचा वापर करुन थेट संपर्क कमीत कमी येईल व शेतकऱ्यांना निविष्‍ठा उपलब्‍ध होतील यासाठी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी तसेच  संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांनी  त्‍यांचे  स्‍तरावरुन आवश्‍यक ते नियोजन करावे, असे आदेशात म्हटले आहे.

 कोविडच्या पार्श्वभुमिवर कृषी सेवा केंद्र व संबंधीत दुकानांमध्‍ये  काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करुन घेणे अनिवार्य राहील. सर्व प्रकारच्‍या कृषी उत्‍पादने व साहित्‍याचा पुरवठा हा नियमितपणे सुरु राहील तसेच कृषी  साहीत्‍य व संबंधीत उत्‍पादने  यांची मालवाहतूक या करिता स्‍वतंत्र परवानगीची आवश्‍यकता राहणार नाही. कोविड या विषाणूचा  प्रादुर्भाव  व फैलाव होवू नये या करिता निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशांचे  तंतोतत पालन करण्‍यात यावे,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :