पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार       अकोला, दि. 29 ; साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबांसाठी नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यातील 200 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   समाजातील कुटुंबांची सामाजिक , आर्थिक उन्नती व्हावी , त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून 18 ते 50 वर्षांदरम्यान वय असलेल्या व्यक्तींना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छूक अर्जदारांनी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, आरोग्यनगर चौक, नालंदानगरच्या बोर्डाजवळ , कौलखेड रोड. अकोला येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री . ए . वाय . वाडीवे यांनी केले आहे .                     अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत), पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड , मतदान कार्ड , शैक्षणिक दाखला, रहिवास प्रमाणपत्र, बँक खात

बालगृहातील मुलांचे प्रतिपालक व्हा - जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन

  बालगृहातील मुलांचे प्रतिपालक व्हा  - जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन  अकोला दि. 28 : बालगृहातील मुलांना कुटुंबाची गरज असते. त्यामुळे अशा मुलांना प्रतिपालकत्व स्वीकारण्यास समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागातर्फे बालगृहातील मुलांसाठी प्रतिपालकत्व योजना (फॉस्टर केअर) योजना राबवली जाते. जिल्हाधिका-यांकडून त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. बालकांच्या मुलभुत हक्कांच्या संरक्षणासाठी बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार कार्यवाही होते. त्यात बालकांचे सर्वोत्तम हित महत्वपुर्ण मानले आहे. कोणतेही लहान मूल हे अनाथ असू नये. प्रत्येक बालकाला परिवार मिळावा यासाठी प्रतिपालकत्व योजना राबवली जाते. बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार बालकाला जर जैविक माता- पिता किंवा कोणीही जवळचे नातेवाईक नसतील तर अशा बालकांना प्रतिपालकत्व मिळावे असे नमुद आहे. बालकांचा विकास हा कुटुंबातच चांगल्या प्रकारे होतो. त्यांना आई, वडलांचे प्रेम कुटुंबातच मिळते. अकोला जिल्ह्यात तीन बालगृह व एक शिशुगृह कार्यरत आ

बिगरमोसमी पाऊस नुकसानाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी पंचनामे पूर्ण करून तत्काळ अहवाल द्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  बिगरमोसमी पाऊस नुकसानाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी पंचनामे पूर्ण करून तत्काळ अहवाल द्यावा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 27 : जिल्ह्यात बिगरमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिगरमोसमी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. अकोला तालुक्यातील वल्लभनगर, निंभोरा, कासली आदी गावांतील शेतीक्षेत्राची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, इतर अधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. जिल्ह्यात बिगरमोसमी काही ठिकाणी गहू, हरबरा, कांदा तसेच इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी तत्काळ शेतीक्षेत्रात जाऊन पीक नुकसानाची पाहणी केली, नुकसानाबाबत कृषी, महसूल विभागांनी तत्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिका-यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्

पीकविमाधारक शेतक-यांनी नुकसानाबाबत तत्काळ पूर्वसूचना द्यावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  पीकविमाधारक शेतक-यांनी नुकसानाबाबत तत्काळ पूर्वसूचना द्यावी   -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 27 : ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले अशा पीक विमाधारक शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पिक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांक वर माहिती देत आपल्या नुकसानाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. बिगरमोसमी पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले. पीक विमाधारक शेतक-यांचे नुकसान झाले असल्यास पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून 72 तासांचे आत देणे आवश्यक असते. बिगर मोसमी पाऊस,   वादळी वारा व गारपीटीमुळे पीक नुकसान झाले असल्यास   पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी शेतकरी बांधवांनी पूर्वसूचनेची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे म्हणाले की, पूर्वसूचना देताना गहू, हरभरा, रब्बी कांदा नुकसान असल्यास बिगर मोसमी पाऊस, गारपीट, चक्रीय पाऊस यापैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झालेले आहे तेच कारण नमूद करावे. गहू, रब्बी कांदा पिकास स्टॅडिंग क्रॉप (उभे पीक

पी.एम. किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

  पी.एम. किसान सन्मान निधीच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन                       अकोला, दि. 27 :   प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 16   वा   हप्ता व नमो किसान महासन्मान निधीचा   दुसरा व तिस-या हप्त्याचे राज्यातील लाभार्थ्यांना वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते   होणार आहे. जिल्ह्यातील कुणीही पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.   पीएम किसान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांचे   ई-केवायसी,   बँक खाते आधार संलग्न करणे   व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे   या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत. तरी ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न नाही अशा व्यक्तींनी तत्काळ पूर्तता करून घ्यावी. याबाबत कृषी विभागामार्फत मोहिमही राबविण्यात आली; पण अद्यापही अकोला जिल्ह्यात   एकूण तीन हजार 105 व्यक्तींची ई-केवायसी   व   पाच हजार 336 व्यक्तींचे   बँक खाते आधार संलग्नीकरण   प्रलंबित असल्याचे दिसून येत   आहे. तरी सर्व लाभार्थीनी शासनाने बंधनकारक केलेल्या

शहरात 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
शहरात 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 22 : अकोला जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार लोकसहभागातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पहिली  ‘फिट अकोला’ हाफ मॅराथॉन स्पर्धा दि. 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. हाफ मॅराथॉन अकोल्यात प्रथमत:च होत असून, अकोलेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.  जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून विविध संस्थांचे सहकार्य व लोकसहभाग मिळवून हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नियोजनभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या उपक्रमाचे रेस डायरेक्टर तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने, सिमरनजीतसिंह नागरा, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, शाश्वत कदम, स्टेट बँक ऑफ इंडियेच्या मंजुषा जोशी, राजेंद्र सुरवसे व अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पर्यटन व नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किमी व 5 किमी या

इमाव, विजाप्र, विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा

  इमाव, विजाप्र, विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा अकोला, दि. 21 :   इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. त्यात प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन विभागाच्या सहायक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. अ र्जाचा नमुना व पात्रतेच्या अटी याचा तपशील सहायक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. हे कार्यालय निमवाडी परिसरात दक्षतानगर पोलीस वसाहतीजवळ असून, त्याचा दूरध्वनी क्र. (0724) 2426438 आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला

  जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला अकोला, दि. 21 : बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात होऊ घातलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कार्यवाहीत रोखण्यात आला. आता मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करून देणार नाही, असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील निंभारा गावात एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मंगळवारी (20 फेब्रुवारी) मिळाली. त्यानंतर कक्षातर्फे पथकाने तत्काळ या गावात जाऊन माहिती घेतली. बालविवाह होणार असल्याची खातरजमा झाल्यावर पथकाने मुलीच्या पालकांची भेट घेतली व मुलीचे वय 18 वर्षांहून कमी असल्याने आपण लग्न लावून दिल्यास आपल्यावर बालविवाह अधिनियम 2006 अंतर्गत कार्यवाही होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न लावून देणार नसल्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. त्यामुळे हा बालविवाह रोखला गेला. या कार्यवाहीप्रसंगी संरक्षण अधिकारी सुनील सरकटे, सचिन घाटे, समुपदेशक शंकर वाघमारे, शुभांगी लाहुडकर, सरपंच नीलेश खरात आदी उपस्थित होते

संत रोहिदास विकास महामंडळातर्फे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  संत रोहिदास विकास महामंडळातर्फे ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचावा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 21 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे विविध प्रशिक्षण, तसेच व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील युवक, महिला, तसेच पात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेऊन स्वयंविकास साधावा व सर्व गरजू व्यक्तींनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.   संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, तसेच ‘शासन आपल्या दारी’अंतर्गत ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. महामंडळाचे प्रदेश निरीक्षक गजानन भटकर, अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, मधुकर वडनेरकर, प्रवीण चोपडे, रामाभाऊ उंबरकर, संज्योती मांगे, एच. जी. आत्राम, नीता अंभोरे, प्रसन्न रत्नपारखी, अरूण हेगडे, वर्षा खोब्रागडे आदी यावेळी उपस्थित होते. महामंडळातर्फे चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची आदी घटका

निवडणूक दरनिश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीद्वारे चर्चा

इमेज
  निवडणूक दरनिश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीद्वारे चर्चा अकोला, दि. 16 : आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता उमेदवारांकडून विविध प्रचार बाबींवर होणारा खर्च मोजण्यासाठी दर निश्चितीची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे  दिले. निवडणूक उमेदवार खर्च गणनेसाठी दरनिश्चिती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. निवडणूकीपासून निवडणूक संपेपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून जो खर्च केला जाईल, त्या सर्व बाबींचे दर जसे भोजन, नाश्ता, चहापान, हॉटेल विश्रांती, टीव्ही, संगणक, इंटरनेट भाडेतत्वावर घेणे, सोशल मीडिया वापर, बॅनर, पत्रके छपाई, वृत्तपत्र, टीव्ही जाहिराती, मंडप साहित्य, वाहतूक व्यवस्था, झेंडे आदी विविध बाबी निश्चित करावयाच्या आहेत. शहरी व ग्रामीण स्थानिक बाजारपेठेतून दर विचारात घेऊन निवडणूक खर्चाची जिल्हा दरसूची तयार करावी. संपूर्ण तपासणी व पडताळणी करून ही कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. ०००

सण-उत्सवांचे 13 दिवस ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वा. पर्यंत मुभा

  सण-उत्सवांचे 13 दिवस ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वा. पर्यंत मुभा अकोला दि. 13 : यंदा विविध सण व महत्वाचे 13 दिवस सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला आहे. त्यात शिवजयंती (19 फेब्रुवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), महाराष्ट्र दिन (1 मे), गणपती उत्सव दुसरा दिवस (8 सप्टेंबर), गौरी पूजन (11 सप्टेंबर), गौरीविसर्जन   (12 सप्टेंबर), अनंत चतुर्थी (17 सप्टेंबर), ईद ए मिलाद (16 सप्टेंबर), नवरात्री उत्सव (10 व   11 ऑक्टोबर), दिवाळी (दि. 1 नोव्हेंबर), नाताळ (दि. 25 डिसेंबर), तसेच 31 डिसेंबर या तारखांना रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करता येईल.   विहित ध्वनी मर्यादा व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.   ०००

जिल्ह्यात कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

  जिल्ह्यात कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू अकोला, दि. 15 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता आजपासून (दि. 15 फेब्रुवारी) दि. 26 फेब्रुवारीच्या रात्री बारापर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश निर्गमित केला. त्यानुसार मिरवणूक, उपासनास्थळ व तेथील परिसरात गर्दी व अडथळा होऊ न देणे, मिरवणुकीचे मार्ग निश्चित करणे, वाद्य, ढोलताशे वाजविण्याबाबत नियमांचे पालन करणे, ध्वनीक्षेपकाची विहित मर्यादा राखणे आदींद्वारे सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. ०००

जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई- किऑस्क मशिन सुविधा

इमेज
  जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई- किऑस्क मशिन सुविधा अकोला, दि. 15 : जिल्हा कारागृह, तसेच महिला खुल्या कारागृहात बायोमेट्रिक टच स्क्रीन- ई किऑस्क सुविधा   कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. ई- किऑस्कमुळे बंदीजनांना स्वत:चे केस स्टेटस, खासगी बँकेचा तपशील, पुढील सुनावण्या तारीख, पॅरोल आदींच्या अर्जांची स्थिती, रोजगार मेहनताना आदी त्यांच्याशी निगडित माहिती पाहता येणार आहे. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवरील आदेशानुसार बंद्यांना ई- मुलाखत सुविधा सुरू करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या नातेवाईक व वकीलांना ई- मुलाखत ॲपद्वारे काही दिवस आधी मुलाखत आरक्षित करता येऊ शकेल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोकअभिरक्षक श्री. उंबरकर, जिल्हा कारागृहाचे प्र. अधिक्षक ज्ञानेश्वर पाटील, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अमृत आगाशे, रोहित बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी रवींद्र आर्य आदी उपस्थित होते. ०००

अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा

  अकोल्यात शुक्रवारी म हिलांसाठी रोजगार मेळावा अकोला, दि. 14 :   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगारइच्छूक महिलाभगिनींसाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे विशेष पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील धूत इलेक्ट्रिकल्स, अबेल इलेक्ट्रो-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पिंपल ट्री वेंचर, टॅलेनसेतू आदी आस्थापना, कंपन्यांतील 284 पदे भरण्यात येणार आहेत.   मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी www.mahaswayam.gov.in   वर नोंदणी करावी.   इच्छूक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह मेळावास्थळी   उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले. अधिक माहितीसाठी (०७२४)   २४३३८४९ या दूरध्वनी किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००          

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे वाडेगाव येथे गुरूवारी मेळावा

    खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे वाडेगाव येथे गुरूवारी मेळावा अकोला, दि. 14 : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती नागरिकांना मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती मेळावा उद्या (15 फेब्रुवारी) वाडेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात होणार आहे. या मेळाव्यात इतरही शासकीय विभाग सहभागी होतील. मंडळामार्फत पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, मध केंद्र योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ महिला, युवक-युवती, आदिवासी बांधव, सर्व समाजघटकांना व्हावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखडे यांनी केले आहे. ०००    

वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी - - राज्यपाल रमेश बैस

इमेज
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी -             -           राज्यपाल रमेश बैस अकोला, दि. 14 : जलवायू परिवर्तन व वातावरणातील बदलांचे आव्हान कृषी क्षेत्रापुढे उभे ठाकले आहे.   त्यावर मात करण्यासाठी व त्याला अनुकूल पीकपद्धती निर्माण करण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी , असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली आज दीक्षांत सभागृहात झाला. राज्यपाल श्री. बैस, तसेच विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे समारंभाला ऑनलाईन उपस्थित होते. नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल, कुलगुरू डॉ. शरद गडाख, कार्यकारी परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता व अनेक मान्यवर उपस्थित होते.  राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, वातावरणातील बदलाला अनुकूल पीकपद्धती निर्माण करणे ही आजची गरज आहे. पुढील काळात शेती क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी पदवीधरांनी व्यापक संशोधन कर

सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले

  सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले   अकोला, दि. 13 : सैनिक कल्याण विभागातर्फे क वर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यात असून, त्यासाठी माजी सैनिक उमेदवारांनी दि. 3 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले आहे. विभागाच्या विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतील 40 क ल्याण संघटक, 17 वसतिगृह अधिक्षक, 1 कवायत प्रशिक्षक, 1 शारिरिक प्रशिक्षण निदेशक आदी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज करावेत. वसतिगृह अधिक्षिका या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातुन किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून  दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज  www.mahasainik.maharashtra. gov.in   या संक

निवृत्तीधारकांनी प्राप्तीकर कपातीबाबत लेखी अर्ज करावा जिल्हा कोषागाराचे आवाहन

निवृत्तीधारकांनी प्राप्तीकर कपातीबाबत लेखी अर्ज करावा जिल्हा कोषागाराचे आवाहन अकोला, दि. 13 :  फेब्रुवारीच्या मासिक निवृत्तीवेतन देयकातून प्राप्तीकराची कपात करणे नियमानुसार करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नियमित व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या वेतनातून करावयाच्या कपातीबाबत लेखी अर्जाद्वारे कळवावे, असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे. वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात देय प्राप्तीकराची गणना करणेबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या मासिक निवृत्तीवेतनातून जुन्या प्राप्तीकर प्रणालीनुसार प्राप्तीकर कपात करावयाची असल्यास दि.15 फेब्रुवारीपर्यंत बचतीच्या प्रमाणपत्रासहित लेखी अर्ज करावा, असे आवाहन अकोला जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले. ०००  

यांत्रिकीकरण योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा - एसएओ शंकर किरवे

  यांत्रिकीकरण योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा -          एसएओ शंकर किरवे   अकोला, दि. 13 : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानात यांत्रिकीकरण योजनांसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. पाईप (HDPE PIPES/PVC PIPES) वैयक्तिक शेतकरी वापरासाठी पाण्याच्या स्त्रोता पासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप खरेदीवर एचडीपीई पाईप्स ५० मीटर व   पीव्हीसी पाईप्स ३५ मीटर खरेदीवर जास्तीत जास्त रु.१५ हजार किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे. पंपसंच वैयक्तिक शेतकरी वापरासाठी विहीर /शेततळे पाण्याच्या स्त्रोतातून पाणी उपसा करण्यासाठी विहिरी व शेततळे करिता बसवलेले पंपसंचाला 10 हजार रु   किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ; मान्यवरांची उपस्थिती समारंभात 4 हजार 40 स्तानकांना होणार पदवी प्रदान

इमेज
  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ; मान्यवरांची उपस्थिती समारंभात 4 हजार 40 स्तानकांना होणार पदवी प्रदान अकोला, दि. 13 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात होणार आहे. समारंभात 4 हजार 40 स्नातकांना विविध पदव्यांचे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आज येथे दिली. शेतकरीसदनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, या समारंभाला विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पाटील हे मुख्य अतिथी उपस्थित राहतील. समारंभात कृषी विद्या, तसेच कृषी अभियांत्रिकी शाखेच्या एकूण 3 हजार 635 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येतील. 36 स्नातकांना आचार्य पदवी प्रदान होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेच्या 369 स्नातकांना पदवी देण्यात येईल. त्यातील 2 हजार 538 स्नातक प्