मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ


        अकोला,दि. (जिमाका)-   छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारीत राबविण्यात येत आहेया कार्यक्रमास  भारत   निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र  राज्य यांनी  मुदतवाढ  दिली आहेत्यानुसार पुनरीक्षण कार्यक्रम याप्रमाणे-
 शुक्रवार  दि. १३ मार्च एकत्रीकृत  प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे.
शुक्रवार  दि. १३ मार्च ते बुधवार दि. १५ एप्रिल-दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी
शनिवार दि. २८ ते रविवार दि. २९ मार्च तसेच  शनिवार  दि. ११ ते  रविवार दि.१२  एप्रिल- विशेष मोहिमांचा कालावधी.
गुरूवार दि. ३० एप्रिल- पूर्वी  दावे व हरकती निकालात  काढणे 
बुधवार दि. ६ मे पुर्वी- प्रारूप  मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि  मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी करीता आयोगाची परवानगी घेणे.
सोमवार दि. ११ मे पूर्वी-  डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी  याद्यांची छपाई करणे
शुक्रवार दि. १५ मे- मतदार  यादीची अंतिम प्रसिद्धी करणे.
            या कार्यक्रमानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करणे,  नाव वगळणे तसेच मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत, मयत  मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत राबविली आणार आहे. तरी नागरीकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन  मतदान केंद्र स्तरीय  अधिकारी यांचे मार्फत मतदार नोंदणी अधिकारी  व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र  पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन