जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन गुरुवारी (दि.५)
अकोला,दि.३(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविला जाणारा स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन हा उपक्रम गुरुवार दि.५ होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन
भवन, येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी
या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा