बी.एस.- ४ मानकांच्या वाहनांची नोंदणी ३१ मार्च नंतर बंद
अकोला,दि.३(जिमाका)- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतात
सद्यस्थितीत वाहनांसाठी ची प्रदुषण मानके. बी.एस. ४ सुरु आहेत, ही मानके दि. ३१
मार्च नंतर बंद केली जाणार असून नंतर कोणत्याही बी.एस. ४ वाहनांची नोंदणी
३१ मार्च नंतर केली जाणार नाही,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.
यासंदर्भात सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार
यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुणाचे
बी.एस. ४ वाहन काही कारणास्तव नोंदणी करण्याचे प्रलंबीत असेल त्यांनी आपल्या वाहनाची
नोंदणी शुक्रवार दि.२० मार्च पुर्वी पूर्ण करुन घ्यावी. संगणकीयं वाहन प्रणालीवर
दि. ३१ मार्च नंतर फक्त बी एस ६ मानकांच्या
वाहनाची नोंदणी करता येणार आहे. येत्या दि. २५ मार्च रोजी गुढीपाडवा आहे,
त्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी त्यापूर्वीच किमान ६ ते ७ दिवस
अगोदर वाहनांची सर्व पूर्तता (जसे की, शुल्क, कर इ. भरणे) पूर्ण करून घ्यावी जेणे करून HSRP नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. 25 मार्च रोजी वाहन सुपूर्त करू शकतील.
यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
व संगणकीय प्रणालीवरील बदल पाहता बी एस ४ मानकांच्या वाहनांची नोंदणी होणार नसून
वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया दि.२० मार्च पुर्वीच करावी,
असे आवाहन सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा