जन सत्याग्रह संघटनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान ;आणखी लोकांनी पुढे येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला,दि.२५ (जिमाका)-  संचारबंदीच्या वातावरणात विविध रुग्णालयांमध्ये  उपचार घेत असलेल्या अन्य आजारांच्या वा शस्त्रक्रियेच्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून  जन सत्याग्रह संघटने शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर घेतले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे शिबिर घेण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            हे रक्तदान शिबिर  आयोजनात डॉ राम चोपड़े, डॉ आशिष शिंदे, डॉ. अभिजित सोनटक्के, डॉ. अनिकेत काकडे, डॉ. तपस्या भारती, प्रज्ञा पिंपळकर, आसिफ अहमद खान, अनिल जाधव, शिल्पा तायडे, अंभोरे, खोद्रे, जावेद ठेकेदार, अब्बास चौधरी, अंजार अहमद खान, रुबिन मोझझम, इम्रान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील रक्तदात्यांना आणखी लोकांनी पुढे यावे तसेच आपापल्या भागातील प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याकडे नावे नोंदवून रक्तदान आवश्यकतेनुसार करावे, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ