मौजे उगवा येथे पांदण रस्ता कामाचा शुभारंभ





अकोला,दि.7 (जिमाका)- पालकमंत्री पांदन रस्ते अंतर्गत लोकसहभागातून सांगवी मोहाडी ते उगवा (2.25 कि.मी.) शेतरस्ता तयार करण्याच्या कामाचा आज जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पापळकर यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांकरीता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच इतर सामाजिक संस्थाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. बहुतांश शेतकऱ्यांना शेतरस्त्याची समस्या निर्माण होत असते. ही समस्या सोडवण्याकरीता पालकमंत्री पांदण रस्ते या कार्यक्रमा अंतर्गत शेतरस्त्याची कामे करुन घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी पापळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. सदर कार्यक्रमा अंतर्गत पांदन रस्ते, शेतरस्ते इत्यादी कामे करण्यात येतात. या कामाकरीता भारतीय जैन संघटना यांच्या कडून जेसीबी (JCB) मशीन उपलब्ध करुन देण्यात येते. जेसीबी मशीन करीता लागणाऱ्या डीझेलचा खर्च लोकवर्गणीतून करणे अपेक्षित आहे. 
 उद्घाटनास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,), उपविभागीय अधिकारी निलेश अपार  , तहसीलदार  विजय लोखंडे,  जे. जे. पवार, (मंडळअधिकारी, उगवा), भगवान थिटे, (मंडळ अधिकारी, अकोला), नंदकिशोर माहोरे (तलाठी), मंगला  तायडे (तलाठी), एम. के. गीरी (तलाठी) तसेच गावकरी  प्रभाकर वासुदेव अटकर,  इश्वरलाल नारायणलाल पटेल,  गजेंद्र हिरालाल पटेल,  विवेक भानुदास गोरले, गणेश ज्ञानदेव लोड, सुनील माणीक सिरसाट,  गजानन तुळशीराम अडसुळे, सागर वल्लभदास पटेल,  अनील आनंदापटेल,  मनोहरभाऊ शेषश्राव डहाके, जनार्दन मोतीराम पांडव,  रविंद्र यशवंतराव देशमुख, हिम्मतलाल काशिनाथ पटेल,  अक्षय रसीकलाल पटेल तसेच गावकरी उपस्थित होते.
                                                                        00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ