२० पैकी १७ निगेटिव्ह, तीन अहवाल प्रलंबित


अकोला,दि.२५ (जिमाका)- आज अखेर पर्यंत अकोला जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्या ही शून्य आहे. आज दिवसभरात २० प्रवाशांचे नमुने घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठवले त्यातील १७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत तर तिघांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात अद्यापही शून्य रुग्ण ही दिलासादायइ स्थिती कायम आहे. दरम्यान आज २०  व्यक्तिंची तपासणी करुन त्यांचे नमुने पाठवण्यात आले आहे. त्यातील १७ जणांचे नमुने  निगेटिव्ह आले आहेत. अन्य तिघांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान आतापर्यंत विदेशातून ११० जण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ५० जण गृह विलगीकरणात आहेत. तर तिघे जण अलगीकरणात आहेत. आतापर्यंत ५७ जणांचे गृह विलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली असून ते पुर्णतः निरोगी आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ