अकोला डाक विभागात १३ कार्यालये सुरु राहणार


अकोला,दि.२३ (जिमाका)- अकोला व वाशिम जिल्हा मिळून होणाऱ्या अकोला डाक विभागाच्या एकूण  ३९९ कार्यालयांपैकी ३१ मार्च पर्यंत केवळ १३ कार्यालये सुरु राहणार असून ही कार्यालयेही केवळ आर्थिक सेवा देणार आहेत. टपाल बुकिंग व वाटप सेवा बंद राहणार आहेत असे प्रवर अधिक्षक डाकघर अकोला यांनी कळविले आहे.
कोरोना विषाणू फैलावाला प्रतिबंध करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ह्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अकोला व वाशिम जिल्ह्यातील  अकोला प्रधान डाकघर अकोला,  अकोट उप डाकघर, बाळापूर उप डाकघर, कारंजा उप डाकघर, मालेगाव उप डाकघर, मानोरा उप डाकघर, मुर्तिजापूर उप डाकघर, पातुर उप डाकघर, रिसोड उप डाकघर, तेल्हारा उप डाकघर,  वाशिम मुख्य डाकघर ही १३ कार्यालये सुरु राहणार असून अन्य सर्व बंद राहणार आहेत. बंद असणाऱ्या कार्यालयात ३२ उप डाकघर, ३५४ खेड्यातील शाखा कार्यालये आहेत, ही सर्व बंद राहतील. सुरु असलेल्या १३ कार्यालयात केवळ आर्थिक व्यवहार होतील. अन्य सर्व सेवा दि.३१ पर्यंत बंद राहतील,असे प्रवर अधिक्षक डाकघर, अकोला विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा