अमरावती विभागीय सांस्कृतिक स्पर्धा अकोला जिल्हा सांस्कृतिक विभागमध्ये व्दितीय





*महसुल विभागाने सादर केला बहारदार कार्यक्रम
*छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालसुरे यांना समर्पीत केला मराठी बाणा
*उत्कृष्ठ गायन, उत्कृष्ठ वेशभुषा, उत्कृष्ठ समुह नृत्य अशा विविध  पुरस्काराचे प्रदान
*अकोला जिल्ह्यातील  महसुल विभागीय धिकारी व कर्मचारी यांचा  सहभाग
*प्रा. संजय खडसे , निवासी  उपजिल्हाधिकारी यांच्या दिग्ददर्शनात तयार झाला  ‘मराठी बाणा’

अकोला,दि.6 (जिमाका)- नुकत्याच यवतमाळ येथे संपन्न झालेल्या  अमरावती विभागीय महसुल क्रीडा  व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या महसुल चमुनी बहारदार सांस्कृतिक  कार्यक्रम करून उपस्थित  प्रेक्षकांची मनमुराद  दाद मिळाली, परिक्षकांच्या  कसोटीत उतरून पाच  जिल्ह्यामधुन व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.  सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्याच्या चमूने ‘मराठी बाणा’  बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या रंगारंग कार्यक्रमाची सुरूवात  महाराष्ट्रारची  वैभवशाली गौरवगाथा सांगणा-या गर्जा महाराष्ट्र  माझा या  निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, यांनी गायलेल्या बहारदार गीतोने झाली.  त्यानंतर  तहसिलदार पुरूषोत्तम भुसारी, यांनी शिवछत्रपती च्या वेशभुषेमध्ये अभिनय सादर केला . कर्ज माफ झालं या गीतावर उमा गांवडे व शशीकांत फासे, यांचे युगल नृत्य, अंध मुलीली आपले डोळे जिवंतपणी देत मुलीली दुष्टी देणा-या या  वडिलांची कथा  मुकनाटीकेतून सादर कली. डॉ. निलेश अपार यांची बासरी सोबत अरूण इंगळे  यांनी  गिटाराची  तार छेडत सप्तसुरांची मैफील सजवली  यानंतर मैत्रीची  महती सांगणारे  प्रा.  संजय खडसे, यांचे गीत गायन, चारू  वाघमारेचे बहारदार लावणी  नृत्य, उमा गांवडेचे, एकल गीत गायन व सुनील डाबेराव सोबत युगल गीत गायन, दिलखेचक कोळी  नृत्य, उमा गांवडेचे , एकल गीत गायन व सुनील डाबेराव सोबत युगल गीत गायन, दिलखेचक कोळी नृत्य, भावनाप्रदान एकपात्री प्रयोग सादर करीत  शेवटी नरवीर   तानाजीच्या जीवनावरील  भव्य  अशी समुहनृत्य  नाटीका अमोल बेलखेडे व त्यांचा संच यांनी सादर करीत कार्यक्रमाचा समारोप झाला.
उत्कृष्ठ समुह गाण- महाराष्ट्र माझा- प्रा संजय खडसे व त्यांचा  संच.
उत्कृष्ठ समुह नृत्य- श्रीमती गायत्री काकड व त्यांचा संच.
उत्क्‌ष्ठ वेशभुषा-  पुरूषोत्तम भुसारी, तहसिलदार बाळापुर.
उत्कृष्ठ  अभियान- कु. उमा गांवडे
 जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर  यांच्या  मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या  सांस्कृतिक कार्यक्रमाच्या  निर्मितीसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व मुर्तिजापुरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते , तहसिलदार पुरूषोत्तम भुसारी  ,  तहसिलदार विजय लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यामध्ये प्रा. संजय खडसे , पुरूषोत्तम भुसारी, अरूण इंगळे, हरीहर निमकंडे,  श्रवण भराडी , दिपक सोळंके, प्रशांत सायरे, नरेंद्र बडेरे, नंदु काळे,  नंदू मांडवे, उज्वला सांगळे,  वंदना वानखडे, प्रिती इंगळे, अंजली घरडे, चारू  वाघमारे, गायत्री काकड, धनश्री पाटकर, प्रेमा हिवराळे,  शेख अन्सार, अमोल  बेलखेडे, प्रमोद घोगरे, यांचे सह अनेक कलावंत सहभागी होते.  कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रशांत बुले यांनी केले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ