कर्ज मुक्तीने शेतक-यांना दिलासा जिल्हाधिका-यांकडे व्यक्त केले आभार



        अकोला,दि.6 (जिमाका)- राज्य शासनाने नुकतेच शेतकरी कर्जमुक्ती व  शेतक-यांशी संबधीत शेतक-यांना दिलासादायक निर्णय घेतले. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने  जिल्ह्यातील बळीराजा सुखावला असुन प्रशासनाला या कर्तव्य  परायणतेबद्दल शेतकरी बांधवांनी आभार व्यक्त केले आहेत.
            या संदर्भात आज जय गजानन कृषिमित्र बहुउद्देशीय  संस्था या  संस्थेच्या  पदाधिका-यांनी  प्रत्यक्ष  भेटुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  यांचे आभार मानले. तसेच आभाराचे पत्र देखील दिले.  महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना,  पिक विमा,  पिक कर्ज, प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजना, दुष्काळ मदत,अवकाळी वृष्टी मदत इ. अशा अनेक प्रसंगी शेतक-यांना मदत व  दिलासा देण्यासाठी  जिल्हाधिकारी यांचेसह जिल्हा  प्रशासन  तत्परतेने कर्तव्य  बजावत असतात.  अथक परिश्रम घेत असतात. , अशा  शब्दात शेतक-यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  यावेळी जिल्हाधिकारी  पापळकर यांची जय गजानन कृषि मित्र  बहुउद्देशीय संस्थेचे  जयेश सदावर्ते , मोहन सोनोने, जे.टी. कराळे, गिरिश नानोटी, श्रीकृष्ण तुपकरी, संजय वानखडे, विकास घाटोळ, योगेश बरडे व अन्य शेतकरी उपस्थित होते.
            यावेळी शेतक-यांशी बोलताना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, प्रशासनातले सर्व  अधिकारी-कर्मचारी हे आपले कर्तव्य करीत असतात. शेतक-यांना चिंतामुक्त करणे हे शासनाचे उदिष्ट आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि त्यातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी  सदैव  तत्पर असेल, अशी भावना जिल्हाधिका-यांनी   शेतक-यांशी बोलताना व्यक्त केली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ