सोमवार (दि.१६) पासून जलजागृती सप्ताह


           अकोला,दि.१३ (जिमाका)-   दरवर्षी  प्रमाणे यावर्षीही सोमवार दि. १६ ते रविवार दि.२२ दरम्यान  जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे वेळापत्रक याप्रमाणे-
                 सोमवार दि.१६ रोजी सकाळी साडेदहा  वा.  नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जलसप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन,  
मंगळवार दि. १७ रोजी  तेल्हारा तालुक्यातील वाडी  अदमपूर येथे प्रभात फेरी,   वान प्रकल्प लाभ क्षेत्रातील वाडी अदमपुर येथे पाणी बचतीबाबत  चर्चा सत्र,
बुधवार  दि. १८ रोजी   मुर्तिजापुर तालुक्यातील दहिगाव गांवडे  येथे प्रभात फेरी, काटेपुर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील   मौजे दहिगांव गांवडे गावामध्ये लाभधारकामध्ये पाण्याचे  महत्व  व पाणी टंचाईबाबत चर्चासत्र, गुरूवार दि.१९ रोजी बाळापूर तालुक्यातील मौजे कावठा येथे प्रभातफेरी, कवठा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कवठा येथे उपसा सिंचनाबाबत चर्चासत्र,  
शुक्रवार  दि.२० रोजी  अकोला तालुक्यातील अंत्री मलकापुर येथे प्रभात फेरी,  अंत्री मलकापुर येथे पाणी बचत व पुनर्वसनाबाबत  चर्चासत्र,
शनिवार दि. २१ रोजी सकाळी साडेसहा वा. अकोला शहरात नागरीकांचा सहभाग घेऊन जलजागृतीबाबत वॉटररन , रविवार दि. २२ रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात समारोप समारंभ व नियोजन भवन येथे  दुपारी  साडेबारा वाजता जलसंवर्धन या विषयावर रांगोळी प्रदर्शन. तसेच सोमवार दि.१६ पासुन  अकोट , तेल्हारा , मुर्तिजापुर , बाळापूर, अकोला, पातुर, बार्शिटाकळी या तालुक्यात चित्ररथाद्वारे  दि.२२ पर्यंत  जलजागृती करण्यात येईल, असे  कार्यकारी अभियंता  अकोला पाटबंधारे विभाग यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ