३१ पैकी ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह; एक प्रलंबित


अकोला,दि.३० (जिमाका)-  जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. दरम्यान आजपर्यंत दाखल ३१ जणांपैकी ३० जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणि एका जणाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत विदेशातून आलेल्या १३२ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ४५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ८५ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर एक जणाला विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा