जनगणना २०२१ पूर्वतयारी बैठक: प्रभारी अधिकारी नियुक्ती करुन स्वतंत्र कक्ष सुरु करण्याचे निर्देश
अकोला,दि.३(जिमाका)- आगामी जनगणना २०२१ साठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरु केली असून या
संदर्भात आज एक बैठक घेऊन त्यात तालुका, नगरपालिका, महानगरपालिका निहाय प्रभारी अधिकारी
नियुक्त करुन स्वतंत्र जनगणना कक्ष सुरु करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी
संजय खडसे यांनी आज येथे दिले.
या संदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे
यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, मनपा उपायुक्त आदी उपस्थित होते. यावेळी निर्देश
देण्यात आले की, जनगणना कार्यासाठी
प्रगणकांच्या नियुक्त्या करावयाच्या आहेत. तसेच घरयादी तयार करणे, जनगणना
क्षेत्राच्या सिमा निश्चित करणे आदी कामे करावयाची आहेत. ही कामे व्यवस्थित करण्यासाठी
तालुक्यातील ग्रामिण भागासाठी तहसिलदार, शहरीभागासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी,
महापालिका हद्दीत मनपा उपायुक्त यांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करुन
प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, तहसिलदार कचेरी येथे स्वतंत्र कक्ष सुरु
करण्यात येऊन सर्व नोंदी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा