समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती


अकोला,दि.२७ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत  प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ ची व  आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी  समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्त जिल्हा प्रशासनाने केली आहे. ती याप्रमाणे- अकोला उपविभाग डॉ निलेश अपार, अकोट उपविभाग रामदास सिद्धभट्टी, बाळापूर उपविभाग रमेश पवार, मुर्तिजापूर उपविभाग अभयसिंह मोहिते,  पातूर तालुका गजानन सुरंजे,  तेल्हारा तालुका सदाशिव शेलार, बार्शी टाकळी तालुका बाबासाहेब गाढवे. या अधिकाऱ्यांनी  कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात समन्वय राखावयाचा आहे व तसा अहवाल दररोज जिल्हा प्रशासनास द्यावयाचा आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ