आजपासून (दि.२५) सायं. सहा नंतर सर्व बंद; वैद्यकीय सेवा व औषध वितरण मात्र सुरु राहणार


अकोला,दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी ३१ तारखेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि संचार बंदीतही अनेक लोक विनाकारण बाहेर  फिरत असतात. विषाणू प्रादुर्भावाच्या शक्यतेच्या दृष्टीने हे घातक असल्याने  बुधवार दि.२५ पासून दररोज सायंकाळी सहा वाजेनंतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत. या बंद मधून  वैद्यकीय सेवा, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ