मोकळ्या जागांवर भाजीपाला लागवड, परसबाग विकसित करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

अकोला,दि.३१ (जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   लागू झालेल्या लॉक डाऊनची स्थिती पाहता भाजीपाला टंचाई भासू नये म्हणून विविध शासकीय, सार्वजनिक जागांवर उपलब्ध पाण्याचा वापर करुन भाजीपाला लागवड करावी तसेच  तसेच जिल्हाप्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजना लक्षात घेता घराबाहेर पडणे टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो आपल्या घरीच ( बागेत, छतावर, गॅलरीत इ.) परसबाग तयार करुन त्यात भाजीपाला पिकवावा,असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
 सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन, कृषि विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, नगरविकास विभाग , ग्रामविकास विभाग इ. विभागाच्या जिल्हा यंत्रणामार्फत गावपातळी नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये आत्मा योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत नागरीकांना फळे, भाजीपाला दूध, रेशन, इ. ऑनलाईन ऑर्डर घेऊन वाजवी दरात घरपोच सेवा देण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजीपाला, फळे ई. चे उत्पादन व पूरवठ्यामध्ये भविष्यात नागरिकांना समस्या निर्माण हाऊ नये म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषदा, महानगर पालिका, ओद्योगिक वसाहती मधील कारखाने कृषि विद्यालय व कृषि महाविद्यालय, शासकीय प्रक्षेत्रे , वसतीगृह इ. नी त्यांच्या आवारात उपलब्ध असलेले पाणी व जमिनीवर भाजीपाला, पालेभाज्या इ. किचन गार्डन तयार करावेत. स्वतःच्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला, त्यांच्या स्वत:च्या आवारात उत्पादन करावा, भाजीपाला, पालेभाज्या उत्पादन करण्यासाठी लागणारे बियाणे, सेंद्रिय खते ,सेंद्रिय किटकनाशके ई. जिल्हयातील सर्व परवानाधारक कृषि निविष्ठा विक्रेत्यांकडे साठा उपलब्ध आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये दर दिवशी कृषि निविष्ठा विक्री केंद्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत सूरू ठेवण्याचे आदेश दिलेले असून नागरिकांनी किचन गार्डन साठी आवश्यक लागणाऱ्या निविष्ठा खरेदी कराव्यात, निविष्ठा खरेदि करतांना कोविड -१९ बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे, जसे तोंडावर मास्क लावणे ,किमान तीन मिटर अंतर राखणे इ. गोष्टी पाळाव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी किचन गार्डन स्वत:च्या घराच्या गच्चीवर/परिसराच्या आवारात स्वउत्पादित भाजीपाला, पालेभाज्यांच्या किचन गार्डन संकल्पनेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गावकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ