महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात ८५ हजार ५१० शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध


        अकोला,दि. (जिमाका)-   महात्मा जोतिराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेची राज्यात  अंमलबजावणी करण्यात येत आहे. दि. २८ फेब्रूवारी  रोजी आधार प्रमाणिकरण  करण्याच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यात ८५ हजार ५१० शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असुन याद्यांची प्रसिद्धी ग्रामस्तरावर  करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. 
यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या गावात प्रसिद्ध यादीची पाहणी करून त्यामधील नावे,  कर्ज  रक्कम, बँकेचे नाव,  खाते क्रमांक, आधार  क्रमांक बाबतची तपासणी व पडताळणी करावी. आपल्या नजिकच्या CSC/ आपले सरकार केंद्रावर जावुन आधार प्रमाणिकरण  करून घ्यावे, असे  आवाहन जिल्हा प्रशासन  तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना