परप्रांतातील अकोलेकर व अकोल्यातील परप्रांतियांची माहिती नियंत्रण कक्षास कळवा- जिल्हाधिकारी पापळकर यांचे आवाहन


अकोला,दि.२८ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लागू झालेल्या लॉक डाऊन मध्ये अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले  व सध्या देशातील अन्य भागात असलेले व अकोला जिल्ह्यात वास्तव्यास असलेले व मुळचे परप्रांतिय असलेल्या लोकांची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी वा त्यांनी स्वतः जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
 मुळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी जे सध्या विविध कामांनिमित्त देशाच्या अन्य भागात थांबले आहेत  तसेच देशाच्या अन्य भागातील मुळ रहिवास असलेले व सध्या कामानिमित्त अकोल्यात थांबलेल्या लोकांनी आपली माहिती स्वतः वा आपल्या नातेवाईकांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती नियंत्रण कक्षाच्या ०७२४-२४२४४४४ या दूरध्वनीवर देऊ शकता. त्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीत गर्दी करु नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ