गोट बँक ऑफ कारखेडा हा स्तुत्य उपक्रम - पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार
अकोला,दि. 29 (जिमाका)- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेळीपालना सारखा जोड व्यवसाय करणे गरजेचे असल्याचे सांगून गोट बँक ऑफ कारखेडा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
कारखेडा
ऍग्रो प्रोडूसर कंपनी द्वारा संचालित गोट बँक ऑफ कारखेडा, सांगवी मोहाडी, अकोला या
शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार नितीन देशमुख ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शेळी मेंढी
महामंडळाचे अध्यक्ष बनसोडे ,माजी आमदार हरिदास भदे, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह
सोसायटी चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर मुकेश झवर ,कारखेडा ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे
अध्यक्ष नरेंद्र देशमुख,संचालक के.
जी .देशमुख ,
मनोहरराव डहाके, ॲड. शाम वक्ते ,किशोर पागृत
,विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना.
केदार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना गोट बँक साठी सेंटर तयार करण्यासाठी शासनाकडून
50% सबसिडी देण्यात येईल . शेतकऱ्यांनी बकरीच्या दुधापासून चीज तयार करावे त्याची
मोठ्या प्रमाणात मागणी आहे .शेळीपालना सोबत कुकुटपालन सारखे व्यवसाय शेतकऱ्यांनी
करावे .शासन या सर्व कामासाठी
शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
महिलांना सक्षमीकरणासाठी माविमच्या बचत गटाच्या
माध्यमातून गोट बँक ऑफ कारखेडा हा उपक्रम राबविण्यात याव्यात ,यासाठी महिला व बाल
विकास विभाग सर्व प्रकारची मदत करेल असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री
यशोमती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र देशमुख यांनी गोट बँक
ऑफ कारखेडा बाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बुलढाणा अर्बन
कोऑपरेटिव सोसायटी चे अध्यक्ष मुकेश झवर यांनी मार्गदर्शन केले .सर्वप्रथम गोट बँक
सेंटर तसेच गोट बँक ट्रेनिंग हॉल चे उद्घाटन करण्यात आले .यावेळी गोट बँक ऑफ
कारखेडा च्या माध्यमातून शेळी पालन करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला .या
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला व शेतकरी उपस्थित होते 00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा