कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध


अकोला,दि.२८ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक तात्काळ उपाययोजना करण्यासाठी  सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करणे, आवश्यक सहसाहित्य, उपकरणे, किट्स खरेदी, निर्जंतूकीकरण व अन्य तातडीच्या उपायोजनांसाठी विविध यंत्रणांना हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी महानगरपालिका २ कोटी, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय दोन कोटी,  जिल्हा परिषद आरोग्य विभाग दोन कोटी असे सहा कोटी रुपये तातडीचा निधी म्हणून उपलब्ध झाला आहे,असे सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ